नाशिक मॅरेथॉनमध्ये 15 हजार स्पर्धकांचा सहभाग

नाशिक : नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातर्फे आज नाशिक मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये स्त्री-पुरुष सामानतेचा संदेश देत हजारो नाशिककरांनी सहभाग नोंदविला होता. सामाजिक संदेशाचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने नाशिक शहर पोलीस आयुक्तलयाने ‘नाशिक मॅरेथॉन’ ची खऱ्या अर्थाने सुरवात केली. यंदा या स्पर्धेचं 4 थे वर्ष असून ‘नाशिक शहर पोलीस आणि समस्त नाशिककरांनी या …

नाशिक मॅरेथॉनमध्ये 15 हजार स्पर्धकांचा सहभाग

नाशिक : नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातर्फे आज नाशिक मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये स्त्री-पुरुष सामानतेचा संदेश देत हजारो नाशिककरांनी सहभाग नोंदविला होता. सामाजिक संदेशाचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने नाशिक शहर पोलीस आयुक्तलयाने ‘नाशिक मॅरेथॉन’ ची खऱ्या अर्थाने सुरवात केली. यंदा या स्पर्धेचं 4 थे वर्ष असून ‘नाशिक शहर पोलीस आणि समस्त नाशिककरांनी या स्पर्धेला मोठा प्रतिसाद दिला.

यंदाच्या वर्षी 15 हजारहून अधिक स्पर्धक या नाशिक मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते. यंदाच्या वर्षी स्त्री-पुरुष सामानतेचा संदेश या मॅरेथॉनमधून देण्यात आला. उरी चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारा प्रसिद्ध अभिनेता विकी कौशल आणि अंध धावपटू अमर जीत सिंग चावला यांची उपस्थिती या मॅरेथॉनमध्ये प्रमुख आकर्षण ठरली. या स्पर्धा 42 किलो मीटर, 21 किलोमीटर, 10 किलोमीटर, 5 किलोमीटर, 3 किलोमीटर अशा गटात आयोजित करण्यात आल्या होत्या. यासाठी अकरा हजारहून अधिक स्पर्धकांनी नोंदणी केल्यानंतर त्यांना खास तयार करण्यात आलेले टी-शर्ट देण्यात आले होते. तसेच स्पर्धा पूर्ण करणाऱ्या प्रत्येकाला खास मेडल देण्यात आले होते.

पहाटे पासूनच वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतुकीत बदल करण्यात आले होते,तसेच ठीक ठिकाणी स्पर्धांचा उत्साह वाढवण्यासाठी मॅरेथॉन मार्गावर संगीत, ढोल पथक, बँड, नृत्य आयोजन करण्यात आलं होतं. यासाठी अनेक शाळा तसेच सांस्कृतिक मंडळांचा सहभाग राहिला,प्रत्येक स्पर्धकाला पाणी,एनर्जी ड्रिंक,वैद्यकीय सुविधा,स्वच्छता गृह आदींची व्यवस्था करण्यात आली होती. नाशिक मॅरेथॉनसाठी पुढाकार घेणाऱ्या पोलीस आयुक्तांच नाशिककर कौतुक करत आहे. यावेळी अभिनेते विकी कौशल यांनी या स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांचं कौतुक केलं.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *