महाराष्ट्र काँग्रेसमध्ये हाय व्होल्टेज घडामोडी, बड्या नेत्याचा स्टार प्रचारक यादीतून राजीनामा

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये हालचालींना वेग आला आहे. विशेष म्हणजे काँग्रेसकडून मुंबईत वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर एका बड्या नेत्याची नाराजी समोर आली आहे. हा बडा नेता संबंधित जागेवर उमेदवारीसाठी इच्छुक होता.

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये हाय व्होल्टेज घडामोडी, बड्या नेत्याचा स्टार प्रचारक यादीतून राजीनामा
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Apr 26, 2024 | 7:34 PM

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये सुरु असलेलं नाराजीनाट्य काही केल्या कमी होताना दिसत नाही. काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड नाराज असल्याचं वृत्त समोर आलं होतं. पण त्यांना आता लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर झाली आहे. पण यानंतर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नसीम खान हे नाराज असल्याची बातमी समोर आली आहे. नसीम खान यांनी काँग्रेसच्या स्टार प्रचारक यादीतून राजीनामा दिला आहे. उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून नसीम खान हे निवडणुकीसाठी इच्छुक होते. पण त्या जागेवर काँग्रेस पक्षाकडून वर्षा गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आलीय. त्यामुळे ही नाराजी उफाळून आल्याची चर्चा आहे. महाराष्ट्रात एकही अल्पसंख्याक उमेदवार न दिल्याने नसीम खान नाराज असल्याची माहिती समोर येत आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने 48 जागांपैकी एकही अल्पसंख्याक उमेदवार दिला नसल्यामुळे राज्यातील अनेक अल्पसंख्याक संघटना, महाराष्ट्रासह मुंबईतील काँग्रेस नेते, कार्यकर्ते तसेच अल्पसंख्याक समाजामध्ये तीव्र नाराजगी आहे, असा नसीम खान यांचा दावा आहे. महाराष्ट्र हा पुरोगामी राज्य असून काँग्रेस पक्षाकडून समाजातील प्रत्येक जाती आणि समाजाला प्रतिनिधित्व दिले जाईल, अशी अपेक्षा असते. काँग्रेस पक्षाने 2019 पर्यंत महाराष्ट्रातील प्रत्येक निवडणुकांमध्ये 1 किंवा 2 अल्पसंख्याक समाजातून लोकसभा निवडणुकीकरता मुस्लिम उमेदवार दिलेला आहे. पण यावर्षी एकही अल्पसंख्याक उमेदवार दिला नसल्यानमुळे नसीम खान नाराज आहेत.

नसीम खान यांना उमेदवारी नाही

विशेष म्हणजे मुंबईतील 6.50 लाख अल्पसंख्याक आणि 2 लाख हिंदी भाषी बहुल असलेल्या उत्तर मध्य मुंबई लोकसभा क्षेत्रातून अल्पसंख्याक समाजाचे, काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते, 4 वेळा आमदार आणि राज्यात 5 वेळा मंत्री राहिलेले महाराष्ट्र काँग्रेसचे कार्याध्यक्ष मो आरिफ (नसीम) खान यांना उमेदवारी देऊन लढविण्याचे 2 महिन्यांपूर्वीच काँग्रेस पक्षाने निश्चित केले होते. त्यामुळे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. पण काल अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने उत्तर मध्य मुंबईची उमेदवारी जाहीर केल्याने महाराष्ट्रात विशेषत: अल्पसंख्याक समाजामध्ये तीव्र नाराजी आहे, असा दावा केला जातोय.

नसीम खान यांचा स्टार प्रचारक यादीचा राजीनामा

नसीम खान यांनी सुद्धा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने 48 पैकी एकही अल्पसंख्याक उमेदवार दिला नसल्यामुळे तीव्र नाराजगी दाखवत महाराष्ट्र प्रचार समिति आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या महाराष्ट्रातील लोकसभेच्या 3रा, 4था आणि 5 व्या टप्प्याचे स्टार प्रचारक सदस्य पदाचा राजीनामा अखिल भारतीय काँग्रेस कमिटी आणि महाराष्ट्र कॉँग्रेस कमिटीकडे पाठविला आहे. यामागचे कारण सांगत असताना नसीम खान म्हणाले की, “काँग्रेस पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून कमजोर परिस्थितीतही पक्षाने दिलेल्या सर्व आदेशाचे कठोर पालन मी करत आलो आहे.”

नसीम खान काय म्हणाले?

“पक्षाने मला उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, पश्चिम बंगाल, कर्नाटक, तेलंगणा, गोवा आणि महाराष्ट्र येथे पक्षाचा प्रचार-प्रसार करण्याची जी-जी जबाबदारी दिली होती ती पण मी पूर्ण इमानदारीने पार पडली. पण या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस (MVA)ने 48 जागांपैकी एकही अल्पसंख्याक उमेदवार दिला नसल्याने प्रचारा दरम्यान अल्पसंख्याक समाजाने महाराष्ट्रात कॉँग्रेसने एकही अल्पसंख्याक उमेदवार का नाही देऊ शकले? अशा आणि इतर प्रश्नाचे उत्तर देण्यास माझ्याकडे शब्दच नसल्याने मी प्रचारात भाग घेऊ इच्छित नाही”, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

Non Stop LIVE Update
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट आता..., मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल.
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?
वोट करायला पोहोचला अन् EVM मशीनच पेटवल्या, कुठं घडला धक्कादायक प्रकार?.
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया
मी तिथे गेलो नसतो तर...शिवीगाळचा व्हिडीओनंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल उदय सामंत म्हणाले....
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे.
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त.
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ.
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'.
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?.
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल.