IPL 2024 Purple Cap:  राजस्थान दिल्ली सामन्यानंतर पर्पल कॅप कोणाकडे? जाणून घ्या

IPL 2024 Purple Cap, Most wicket taker : दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स सामन्यानंतर टॉप पाचच्या क्रमवारीत काहीच बदल झालेला नाही. या सामन्यात एकूण 16 गडी बाद झाले. मात्र टॉप पाचमध्ये येऊ अशी कामगिरी झाली नाही. मुकेश कुमारल संधी होती. मात्र त्याचा इकोनॉमी रेट अर्शदीपपेक्षा खराब आहे.

IPL 2024 Purple Cap:  राजस्थान दिल्ली सामन्यानंतर पर्पल कॅप कोणाकडे? जाणून घ्या
Follow us
| Updated on: May 08, 2024 | 12:06 AM

दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सला 20 धावांनी पराभूत करत प्लेऑफच्या शर्यतीत असल्याचं दाखवून दिलं आहे. दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकात 8 गडी गमवून 221 धावा केल्या आणि विजयासाठी 222 धावांचं आव्हान दिलं. राजस्थान रॉयल्सचा संघ 20 षटकात 8 गडी गमवून 201 धावा करू शकला. राजस्थानला 20 धावा तोकड्या पडल्या. दुसरीकडे, या सामन्यात 16 विकेट्स पडूनही दोन्ही संघांचा एकही गोलंदाज टॉप 5 मध्ये नाही. युझवेंद्र चहलने एक गडी बाद केला मात्र सध्या तो 12व्या स्थानावर फेकला गेला आहे. मुकेश कुमार सहाव्या आणि कुलदीप यादव आठव्या स्थानावर आहे. तसं पाहिलं तर या गोलंदाजांमध्ये एक दोन विकेट्सचं अंतर आहे. पण एक विकेट मिळवणं किती कठीण आहे याचा अंदाज येतो.

जसप्रीत बुमराहने 12 सामन्यात 47.5 षटकं टाकली तसेच 297 धावा देत 18 गडी बाद केले. बुमराहाने धावांवर मात्र चांगलाच ब्रेक लावला आहे. त्याला खेळणं चांगल्या चांगल्या फलंदाजांना कठीण जात आहे. बुमराहाचा इकोनॉमी रेट हा 6.20 इतका आहे. दुसऱ्या क्रमांकावर पंजाब किंग्सचा हर्षल पटेल आहे. त्याने 11 सामन्यात 37 षटकं टाकत 362 धावा दिल्या आणि 17 गडी बाद केले. त्याचा इकोनॉमी रेट हा 9.78 इतका आहे. हर्षल पटेलची खासियत म्हणजे तो गेल्या काही पर्वापासून पर्पल कॅपच्या शर्यतीत दिसतोय. त्यामुळे त्याच्या गोलंदाजीचं कौतुक होत आहे. तिसऱ्या क्रमांकावर कोलकाता नाईट रायडर्सचा मिस्ट्री गोलंदाज म्हणून ख्याती असलेला वरुण चक्रवर्ती आहे. त्याने 11 सामन्यात 40 षटकं टाकतं 350 धावा देत 16 गडी बाद केले आहेत. त्याचा इकोनॉमी रेट हा 8.75 आहे. चौथ्या क्रमांकावर सनरायझर्स हैदराबादचा टी नटराजन आहे. त्याने 9 सामन्यात 35.2 षटकं टाकत 318 धावा देत 15 गडी बाद केले. त्याचा इकोनॉमी रेट 9 आहे. पाचव्या क्रमांकावर पंजाब किंग्सचा अर्शदीप सिंग आहे. त्याने 11 सामन्यात 39.2 षटकं टाकत 15 गडी बाद केले आहेत. त्याचा इकोनॉमी रेट 10.06 आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (विकेटकीपर/ कर्णधार), रियान पराग, डोनोवन फरेरा, रोवमन पॉवेल, शुभम दुबे, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल.

दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): जेक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, शाई होप, ऋषभ पंत (विकेटकीपर/कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, गुलबदिन नायब, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मुकेश कुमार, इशांत शर्मा, खलील अहमद

Non Stop LIVE Update
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल.
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य.
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ.
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या...
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या....
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका.
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण.
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल.
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा.
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट.
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.