AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2024 Points Table: दिल्लीच्या विजयाने गुणतालिकेत मोठा ट्विस्ट,  प्लेऑफसाठीची चुरस रंगतदार वळणावर

आयपीएल 2024 स्पर्धेत अजूनही कोणताच संघ अधिकृतरित्या प्लेऑफसाठी क्वॉलिफाय झालेला नाही. त्यात तिसऱ्या संघांपासून सातव्या संघापर्यंत प्रत्येक संघाचे 12 गुण आहेत. त्यांच्यात फक्त नेट रनरेटचा काय तो फरक आहे. त्यामुळे पुढे ही लढत आणखी चुरशीची होणार आहे.

IPL 2024 Points Table: दिल्लीच्या विजयाने गुणतालिकेत मोठा ट्विस्ट,  प्लेऑफसाठीची चुरस रंगतदार वळणावर
| Updated on: May 07, 2024 | 11:45 PM
Share

आयपीएल स्पर्धेतील 56 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सचा 20 धावांनी पराभव केला. दिल्लीने या विजयासह गुणतालिकेत पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे. त्यामुळे आता प्लेऑफची चुरस आणखी रंगतदार झाली आहे. चेन्नई सुपर किंग्स, सनरायझर्स हैदराबाद, दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांचे प्रत्येकी 12 गुण आहेत. त्यांच्यात फक्त नेट रनरेटचा फरक आहे. त्यामुळे प्लेऑफची लढत रंगतदार वळणावर आली आहे. राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स सामन्यानंतरही अधिकृतपणे कोणीही क्वॉलिफाय झालं नाही. त्यामुळे अजून काही सामन्यांची वाट पाहावी लागणार आहे. गणिती भाषेत सांगायचं तर कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्य या दोन संघांनी प्लेऑफमध्ये स्थान मिळवलं आहे. पण इतर दोन संघांसाठी पाच संघांमध्ये जोरदार रस्सीखेच आहे. आता कोण कोणाचा पत्ता कापतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

कोलकाता नाईट रायडर्स 16 आणि +1.453 नेट रनरेटसह पहिल्या स्थानावर आहे. राजस्थान रॉयल्स 16 गुण आणि +0.476 नेट रनरेटसह दुसऱ्या स्थानावर, चेन्नई सुपर किंग्स 12 गुण आणि +0.700 नेट रनरेटसह तिसऱ्या, सनरायझर्स हैदराबाद 12 गुण आणि -0.065 नेट रनरेटसह चौथ्या, दिल्ली कॅपिटल्स 12 गुण आणि -0.316 नेट रनरेटसह पाचव्या, लखनौ सुपर जायंट्स 12 गुण आणि -0.371 नेट रनरेटसह सहाव्या, आरसीबी 8 गुण आणि -0.049 नेट रनरेटसह सातव्या, पंजाब किंग्स 8 गुण आणि -0.187 नेट रनरेटसह आठव्या, मुंबई इंडियन्स 8 गुण आणि -0.212 नेट रनरेटसह नवव्या, तर गुजरात टायटन्स 8 गुण आणि -1.320 नेट रनरेटसह दहाव्या स्थानी आहे.

दरम्यान दिल्ली कॅपिटल्सने 20 षटकात 8 गडी गमवून 221 धावा केल्या. तसेच विजयासाठी 222 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान राजस्थानला काही गाठता आलं नाही. राजस्थान रॉयल्सने 20 षटकात 8 गडी गमवून 201 धावा केल्या. दिल्लीने राजस्थानला 20 धावांनी पराभूत केलं. आता दिल्लीचे अजून दोन सामने शिल्लक आहेत. त्या दौन्ही सामन्यात दिल्लीने विजय मिळवला तर प्लेऑफचं गणित सुटेल. पण एखाद्या सामन्यात पराभव झला तर मात्र कठीण होईल. आता पुढचं सर्व गणित जर तरवर अवलंबून असणार आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (विकेटकीपर/ कर्णधार), रियान पराग, डोनोवन फरेरा, रोवमन पॉवेल, शुभम दुबे, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल.

दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): जेक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, शाई होप, ऋषभ पंत (विकेटकीपर/कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, गुलबदिन नायब, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मुकेश कुमार, इशांत शर्मा, खलील अहमद

शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका.
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?.
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक.
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.