या जगात मद्यप्राशन करणाऱ्यांची संख्या बरीच आहे. भारतातही लाखो लोक आवडीन मद्य प्राशन करतात. काही लोक तर वेगवेगळे मद्य एकमेकांमाध्ये मिसळून पितात. खरं म्हणजे मद्य पिण्यासंदर्भात लोकांच्या अनेक आवडीनिवडी आहेत. परंतु याच मद्यप्राशनच्या फॅशनमुळे कधी-कधी शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो. काही लोक दूध पिल्यानंतर लगेच दारू पितात. तर काही लोक दारू पिण्याआधी दूध पितात. यामुळे शरीरावर नेमका काय परिणाम पडतो ते जाणून घेऊ या..
1 / 5
दूध पिल्यानंतर लगेच मद्यप्रशान केल्याने बहुसंख्य लोकांच्या शरीरावर कोणताही परिणाम होत नाही. परंतु काही लोकांना पचनासंबंधीचा त्रास होऊ शकतो. दारू आणि दूध सोबतच पिल्यावर कधीकधी पोट फुगने, उलटी यासारखा त्रास होऊ शकतो. त्यामुळे असा त्रास होण्याची शक्यता असेल तर दूध आणि दारू थोड्याफार अंतराने पिने टाळावे.
2 / 5
दूध पिल्यानंत दारू कमी वेगाने चढते, असा दावा काही लोक करतात. परंतु यामुळे तुम्हाला अॅसिडिटी, पोट फुगण्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे योग्य ती खबरदारी घ्यावी. विशेषत: ज्या लोकांना अगोदरपासूनच आरोग्यविषय़क समस्य आहेत, अशा लोकांनी दूध आणि मद्य पिण्याचा प्रयोग करू नये.
3 / 5
दूध पिल्यानंतर काही तासांनी मद्यप्राशन केल्यास त्याचा शरीरावर वाईट परिणाम न होण्याची शक्यता असते. त्यामुळे दूध आणि मद्यप्राशन यात काही अंतर ठेवावे. तुम्ही दूध पिले असेल तर मद्यप्राशन करताना अल्कोहोल कमी असलेले मद्य निवडावे. सोडा किंवा कार्बोनेटेड ड्रिंक्स पिने टाळावे.
4 / 5
(मद्यप्राशन आरोग्यास हानीकारक असते. मद्यप्राशन करण्यास प्रोत्साहन देण्याचा आमचा उद्देश नाही. कोणताही प्रयोग करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)