IPL 2024, DC vs RR : दिल्ली कॅपिटल्सचा राजस्थान रॉयल्सला धोबीपछाड, 20 धावांनी केलं पराभूत

आयपीएल 2024 स्पर्धेच्या 56 व्या सामनायत दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सला पराभवाचं पाणी पाजलं. या विजयासह प्लेऑफच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकलं आहे आहे. आता पाच संघांचे एकूण 12 गुण असून प्लेऑफची चुरस वाढली आहे.

IPL 2024, DC vs RR :  दिल्ली कॅपिटल्सचा राजस्थान रॉयल्सला धोबीपछाड, 20 धावांनी केलं पराभूत
Image Credit source: IPL/BCCI
Follow us
| Updated on: May 07, 2024 | 11:31 PM

आयपीएल 2024 स्पर्धेच्या 56 व्या सामन्यात नाणेफेकीचा कौल राजस्थान रॉयल्सने जिंकला आणि दिल्लीला फलंदाजीचं आमंत्रण दिलं. दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना धावांचा डोंगर रचला. 20 षटकात 8 गडी गमवून 221 धावा केल्या आणि विजयासाठी 222 धावांचं आव्हान दिलं. पण राजस्थान रॉयल्सचा संघ 201 धावा करू शकला आणि 20 धावांनी पराभवाचं तोंड पाहावं लागलं. आधीच प्लेऑफचं टेन्शन नसल्याने राजस्थानने आक्रमक सुरुवात केली होती. यशस्वी जयस्वालची विकेट पहिल्या षटकात पडल्यानंतरही आक्रमक बाणा सोडला नाही. जोस बटलर आणि कर्णधार संजू सॅमसन यांनी आक्रमक खेळी करत पॉवर प्लेमध्ये 63 धावांची भागीदारी केली. जोस बटलर बाद झाल्यानंतर संजू सॅमसनने रियानसोबत भागीदारी केली. रियान पराग रसिख सलामच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला.पण धावा आणि चेंडू यांच्यातील वाढतं अंतर पाहता कर्णधार संजू सॅमसनने आक्रमक पवित्रा घेतला. जसा चेंडू मिळेल तशी फटकेबाजी केली. समोर कोणता गोलंदाज गोलंदाजी करतो याची तमा बाळगली नाही.

संजू सॅमसनला शुभम दुबेची साथ मिळाली. संजू सॅमसनने 46 चेंडूत 86 धावांची झुंजार खेळी केली. यात त्याने 8 चौकार आणि 6 षटकार मारले. पण बाद होण्यावरून थोडा वाद रंगला. कारण बाँड्री लाईनला कॅच पकडताना पाय लागला की नाही यावरून बाचाबाची झाली. पण पंचांनी त्याला बाद असल्याचं घोषित केलं. त्यामुळे पंचांना निर्णय मान्य करून संजू सॅमसनला जावं लागलं. शुभम दुबने 12 चेंडूत 25 धावा केल्या आणि खलील अहमदच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर राजस्थानने मोक्याच्या क्षणी विकेट्स गमावल्या. दिल्ली कॅपिटल्सकडून खलील अहमदने 2, मुकेश कुमारने 2, कुलदीप यादवने 2, अक्षर पटेल आणि रसिख दार सलामने प्रत्येकी एक गडी बाद केला.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (विकेटकीपर/ कर्णधार), रियान पराग, डोनोवन फरेरा, रोवमन पॉवेल, शुभम दुबे, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल.

दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): जेक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, शाई होप, ऋषभ पंत (विकेटकीपर/कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, गुलबदिन नायब, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मुकेश कुमार, इशांत शर्मा, खलील अहमद

Non Stop LIVE Update
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल.
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य.
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ.
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या...
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या....
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका.
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण.
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल.
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा.
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट.
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.