AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तो कार्यकर्ता चुकला, मी तिथे गेलो नसतो तर... शिवीगाळचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया

तो कार्यकर्ता चुकला, मी तिथे गेलो नसतो तर… शिवीगाळचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया

| Updated on: May 07, 2024 | 4:32 PM
Share

आमदार दत्तात्रय भरणे यांनी काही कार्यकर्त्यांना शिवीगाळ केल्याचा व्हिडीओ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी ट्वीट केला होता. शिवीगाळच्या व्हिडीओनंतर दत्ता भरणेंवर विरोधकांनी सडकून टीका केली. तर यावर दत्ता भरणे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

इंदापूरचे अजित पवार गटाचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी काही कार्यकर्त्यांना शिवीगाळ केल्याचा व्हिडीओ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी ट्वीट केला आहे. यामध्ये दत्ता भरणे हे काही जणांना शिवीगाळ करताना पाहायला मिळत आहे. तुम्हाला माझ्याशिवाय कोणी नाही. मलाच तुमच्या मदतीला यावं लागेल, असं वक्तव्य त्या व्हिडीओत दत्ता भरणे यांनी केल्याचे दिसतंय. या शिवीगाळच्या व्हिडीओनंतर दत्ता भरणेंवर विरोधकांनी सडकून टीका केली. तर यावर दत्ता भरणे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. ‘मला कार्यकर्त्यांची गर्दी दिसली. मी तेथे गेलो तेव्हा एक बारामती अॅग्रो कारखान्याचा कर्मचारी तिथे लोकांना दमदाटी करत होता आणि त्यापूर्वी त्याने पैशाचं वाटपही केलं होतं. तिथे वाद सुरू होते. मी गेलो त्याला कळलं नाही. त्याने माझ्याबद्दलही अपशब्द वापरले. मी त्याला हटकलं. त्याला जायला सांगितलं. तो निवडणुकीचा विषय नव्हता. बाहेरचा विषय होता. तो कार्यकर्ता चुकला होता. मी तिथे गेलो नसतो तर लोकांनी त्या कर्मचाऱ्याला चांगलाच चोप दिला असता’, असं दत्ता भरणे यांनी सांगितले.

Published on: May 07, 2024 04:32 PM