IPL 2024, DC vs RR : संजू सॅमसन आऊट की नॉट आऊट? व्हिडीओ पाहून तुम्हीच ठरवा काय ते

आयपीएल 2024 स्पर्धेच्या 56 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सला 20 धावांनी पराभूत केलं. या विजयासह दिल्ली कॅपिटल्स गुणतालिकेत पाचव्या स्थानी झेप घेतली आहे. दुसरीकडे, संजू सॅमसनच्या विकेटमुळे वाद रंगला आहे. ाता व्हिडीओ पाहून तुम्हीच ठरवा काय ते

IPL 2024, DC vs RR : संजू सॅमसन आऊट की नॉट आऊट? व्हिडीओ पाहून तुम्हीच ठरवा काय ते
Image Credit source: IPL/BCCI
Follow us
| Updated on: May 08, 2024 | 12:39 AM

आयपीएल 2024 स्पर्धेत पंचांच्या निर्णयावरून सोशल मीडियावर वादाची ठिणगी पडली आहे. त्यात आता संजू सॅमसनच्या विकेटची भर पडली आहे. संजू सॅमसन आऊट की नॉट आऊट यावरून सोशल मीडियावर वाद सुरु आहे. कोणी म्हणतं आऊट, तर कोणी म्हणतं खराब पंचगिरीचा नमुना..पण सामन्यात संजू सॅमसनला तिसऱ्या पंचांनी व्हिडीओ वेगवेगळ्या अँगलने पाहून बाद दिलं. पण त्यावर विश्वास न बसल्याने संजू सॅमसनने पंचांशी मैदानात वाद घातला. तसेच रिव्ह्यू घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तिथपर्यंत सर्व काही जाहीर झालं होतं. त्यामुळे संजू सॅमसनला निराश होत बाहेर पडावं लागलं. आता संजू सॅमसन आऊट होता की नाही याबाबत मतमतांतरं आहेत. त्यामुळे कोणीही खरं काय ते सांगू शकतं. पंचांचा निर्णय अंतिम मानून बाद हेच आता जाहीर आहे. पण संजू सॅमसनचे फॅन्स काही मानायला तयार नाही. झेल पकडल्याचा व्हिडीओ शेअर करत आपली मतं मांडत आहेत. काही जणांनी शाई होपचा पाय सीमेला टेकल्याचं दाखवलं आहे. त्यामुळे हा वाद काही लवकर शमणारा दिसत नाही.

दिल्ली कॅपिटल्सने विजयासाठी 20 षटकात 222 धावांचं आव्हान दिलंह होतं. 11 षटकात दिल्लीने 3 गडी गमवले होते. संजू सॅमसन आणि शुभम दुबे हे फलंदाजी करत होते. संजू सॅमसन धावा आणि चेंडूचं गणित करत होता. धावांचं अंतर वाढत असताना त्याने आक्रमक पवित्रा घेतला. 15.3 षटकात 162 धावा होत्या. तसेच 27 चेंडूत 60 धावांची आवश्यकता होती. मुकेश कुमार गोलंदाजी करत होता. चौथ्या चेंडूवर संजूने जोरदार फटका मारला. हा चेंडू थेट शाई होपच्या हाती गेला. मात्र सीमेवर त्याने पकडलेला झेल वादातीत ठरला. अखेर संजू सॅमसनची खेळी 86 धावांवर संपुष्टात आली. मात्र यानंतर संजू सॅमसन नाराज दिसला.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (विकेटकीपर/ कर्णधार), रियान पराग, डोनोवन फरेरा, रोवमन पॉवेल, शुभम दुबे, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल.

दिल्ली कॅपिटल्स (प्लेइंग इलेव्हन): जेक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, शाई होप, ऋषभ पंत (विकेटकीपर/कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, गुलबदिन नायब, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मुकेश कुमार, इशांत शर्मा, खलील अहमद

Non Stop LIVE Update
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण.
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल.
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा.
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट.
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.
तसाच गेम शिंदेंसोबत, नारायण राणेंबद्दल फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट काय?
तसाच गेम शिंदेंसोबत, नारायण राणेंबद्दल फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट काय?.
मुंबईत कुणाचा किती टक्का? मराठी मताचं विभाजन होणार? कोण किंगमेकर ठरणार
मुंबईत कुणाचा किती टक्का? मराठी मताचं विभाजन होणार? कोण किंगमेकर ठरणार.
बीड मतदाससंघात बोगस मतदान? 'ते' 5 व्हिडीओ रोहित पवारांकडून टि्वट
बीड मतदाससंघात बोगस मतदान? 'ते' 5 व्हिडीओ रोहित पवारांकडून टि्वट.
कोटेचांवर पैसे वाटल्याचा आरोप, शिवसैनिकांवर कारवाई अन् ठाकरेंचा इशारा
कोटेचांवर पैसे वाटल्याचा आरोप, शिवसैनिकांवर कारवाई अन् ठाकरेंचा इशारा.
लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यात 'ठाकरे ब्रदर्स'मध्ये टीकेचा सामना
लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यात 'ठाकरे ब्रदर्स'मध्ये टीकेचा सामना.