AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यातील पाच विधान परिषद जागांसाठी 182 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात, 23 ऑक्टोबरला मतदान तर 27 तारखेला मतमोजणी

महाराष्ट्र विधान परिषदेच्या औरंगाबाद, पुणे व नागपूर विभागातील तीन पदवीधर तसेच अमरावती व पुणे विभागातील दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी शुक्रवार, २३ ऑक्टोबर २०२६ रोजी मतदान होणार आहे.

राज्यातील पाच विधान परिषद जागांसाठी 182 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात, 23 ऑक्टोबरला मतदान तर 27 तारखेला मतमोजणी
5 विधान परिषद जागांसाठी निवडणूक Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 19, 2026 | 8:42 PM
Share

विनायक डावरुंग, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी : महाराष्ट्र विधान परिषदेच्या औरंगाबाद, पुणे व नागपूर विभागातील तीन पदवीधर तसेच अमरावती व पुणे विभागातील दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी शुक्रवार, २३ ऑक्टोबर २०२६ रोजी मतदान होणार आहे. सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार असून, पाच जागांसाठी एकूण १८२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी पाचही मतदारसंघांत २ हजार ४१९ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली असून, १० लाख ६८ हजार ७२ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे.

या पाचही मतदारसंघांतील विद्यमान सदस्यांची मुदत ६ डिसेंबर २०२६ रोजी संपुष्टात येत असल्याने भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार ही निवडणूक घेण्यात येत आहे. मंगळवार, २७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार असून, संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.

पाच जागांसाठी १८२ उमेदवार

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघातून ४१, पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातून ४७ आणि नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातून ३८ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. तसेच अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातून २६ आणि पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातून ३० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. पुणे विभाग पदवीधर मतदारसंघात सर्वाधिक ४७ उमेदवार असून, या पाचही मतदारसंघांत मिळून १८२ उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदार ठरविणार आहेत.

२ हजार ४१९ मतदान केंद्रांवर व्यवस्था

पाचही मतदारसंघांमध्ये एकूण १० लाख ६८ हजार ७२ मतदारांची नोंद आहे. यामध्ये पुणे विभाग पदवीधर मतदारसंघात सर्वाधिक ३ लाख ८८ हजार १९ मतदार, तर अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात सर्वात कमी ३५ हजार ८१० मतदार आहेत.

मतदानासाठी औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघात ८४२, पुणे विभाग पदवीधर मतदारसंघात ७४१, नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात ४४५, अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात ८१ आणि पुणे विभाग शिक्षक मतदारसंघात ३१० मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. सर्व मतदारसंघांतील मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक नियोजन करण्यात आले आहे.

६ डिसेंबरला विद्यमान सदस्यांची मुदत संपणार

विधान परिषदेच्या ज्या पाच जागांसाठी ही निवडणूक होत आहे, त्या जागांवरील विद्यमान सदस्यांचा कार्यकाळ ६ डिसेंबर २०२६ रोजी पूर्ण होत आहे. यामध्ये औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाचे सतीश भानुदासराव चव्हाण, पुणे पदवीधर मतदारसंघाचे अरुण गणपती लाड, नागपूर पदवीधर मतदारसंघाचे अभिजीत गोविंदराव वंजारी, अमरावती शिक्षक मतदारसंघाचे किरण रामराव सरनाईक आणि पुणे शिक्षक मतदारसंघाचे जयंत दिनकर आसगावकर यांचा समावेश आहे.

Follow Us
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; UP पोलिसांसमोर 2 आरोपींचा जबाब..
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; UP पोलिसांसमोर 2 आरोपींचा जबाब काय?
गोकुळच्या निकालात ट्विस्ट; सतेज पाटलांची एक जागा कमी, नेमकं काय घडलं?
Gokul Election Result : गोकुळच्या निकालात ट्विस्ट; सतेज पाटलांची एक जागा कमी, नेमकं काय घडलं?
गोकुळ निवडणुकीत मोठा ट्विस्ट; १३ विरुद्ध १२, कांटे की टक्कर सुरू
Gokul Election Result : गोकुळ निवडणुकीत मोठा ट्विस्ट; १३ विरुद्ध १२, कांटे की टक्कर सुरू
टायगर श्राॅफवर प्रकरणातील आरोपीला कसं पकडलं? पोलिसांनी सगळंच सांगितलं
Tiger Shroff : टायगर श्राॅफवर प्रकरणातील आरोपीला कसं पकडलं? पोलिसांनी सगळंच सांगितलं
महाराष्ट्र पासिंगच्या टॅक्सीतून सुरत गाठलं; टायगर श्रॉफ प्रकरणातील...
Tiger Shroff Case : महाराष्ट्र पासिंगच्या टॅक्सीतून सुरत गाठलं; टायगर श्रॉफ प्रकरणातील संशयितांचा प्रवास CCTV मध्ये कैद
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर दुष्काळाचे सावट...
Eknath Shinde Melava : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर दुष्काळाचे सावट; अवघ्या अडीच तासांत आटोपणार...
बच्चू कडूंची पोलिसांना शिवीगाळ, त्रिशूल मोर्चामध्ये नेमकं काय घडलं?
Bacchu Kadu : बच्चू कडूंची पोलिसांना शिवीगाळ, त्रिशूल मोर्चामध्ये नेमकं काय घडलं?
गोकुळमध्ये महायुतीला मोठा धक्का; तीन माजी चेअरमन पराभूत
Gokul Election Result : गोकुळमध्ये महायुतीला मोठा धक्का; तीन माजी चेअरमन पराभूत
सुनेत्रा पवार दिल्लीमध्ये NDA मधील नेत्यांच्या भेटी घेणार
Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्लीमध्ये NDA मधील नेत्यांच्या भेटी घेणार; भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात
गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटील आघाडीवर; कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष
Gokul Election Result : गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटील आघाडीवर; कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष