AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bank Scam : या बड्या बँकेत कोट्यवधीचा घोटाळा, रिझर्व बँकेंची मोठी कारवाई, तुमचंही अकाउंट आहे का?

मोठी बातमी समोर येत आहे, या बँकेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचं उघड झालं आहे, या प्रकरणात एका आरोपीला अटक देखील करण्यात आलं असून, आरबीआयकडून या बँकेवर 6 महिन्यांचे निर्बंध घालण्यात आले आहेत.

Bank Scam : या बड्या बँकेत कोट्यवधीचा घोटाळा, रिझर्व बँकेंची मोठी कारवाई, तुमचंही अकाउंट आहे का?
RBI Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 16, 2026 | 9:57 PM
Share

आपण एखाद्या बँकेमध्ये किंवा पतसंस्थेमध्ये मोठ्या विश्वासाने ठेवी ठेवतो आणि त्या बँकेत जर घोटाळा झाला तर आपले पैसे अडकून पडण्याची शक्यता असते.  जर घोट्याळ्याचं स्वरुप मोठं असेल तर अशावेळी ठेवीदारांच्या ठेवी बँकेत अडकून पडण्याची शक्यता असते, आपण कष्ट करून कमावलेला पैसा आपल्याला आपल्या कामाच्यावेळी अडचणीच्या वेळी उपलब्ध होत नाही. तसेच अशा बँकांवर आरबीआयकडून देखील कारवाई करण्यात येते. अशावेळी आपला पैसा आपल्याला परत कधी मिळेल याची कोणतीही खात्री नसते. जालन्यातील मोतीराम अग्रवाल मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेत असाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तब्बल 23 कोटी 33 लाखांच्या फसवणुकीचं प्रकरण समोर आलं आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणातील आरोपीला अहिल्यानगरच्या श्रीगोंदामधून ताब्यात घेतलं आहे. त्याला न्यायालयानं आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. बँकेचा घोटाळा समोर आल्यानं ठेवीदारांमध्ये देखील चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. या बँकेवर या प्रकरणात आरबीआय  भारतीय रिझर्व्ह बँकेकडून मोठी कारवाई करण्यात आली असून, पुढील 6 महिन्यांसाठी निर्बंध घालण्यात आले आहेत. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, जालन्यातील मोतीराम अग्रवाल मर्चंड कोऑपरेटिव्ह बँकेत 177 जणांच्या नावाने तब्बल 23 कोटी 23 लाख रुपयांचे बनावट कर्ज काढून बँकेची फसणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.  वेअर हाउसमध्ये अस्तित्वात नसलेला माल दाखवून आरोपीने 177 जणांच्या नावावर हे कर्ज घेतल्याचा प्रकार समोर आला आहे, या प्रकरणी बँक मॅनेजरच्या तक्रारीवरून आरोपी रायचंद कुरंगळ नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

आरोपीला न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने त्याला आठ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान बँकेतील हा कर्जाचा घोटाळा गेल्या 5 वर्षांपासून सुरू होता अशी माहिती मिळत असून, यात बँकेतील काही लोक देखील असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.  या प्रकरणात रिझर्व बँकेने 10 एप्रिल रोजी या बँकेवर 6 महिन्याचे निर्बंध लादले आहेत, या घोटाळ्याचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता देखील वर्तवली जाते आहे. दरम्यान या प्रकरणाची आर्थिक गुन्हे शाखेकडून  चौकशी सुरू आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...