AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यातील 3 मोठी शहरं, 4 महत्वाच्या बातम्या

औरंगाबाद, नाशिक आणि नागपूर शहरातील महत्वाच्या बातम्या.

राज्यातील 3 मोठी शहरं, 4 महत्वाच्या बातम्या
| Edited By: | Updated on: Jan 15, 2021 | 7:54 PM
Share

मुंबई: राज्यातील मोठ्या शहरांमधील महत्वाच्या बातम्या तुम्ही टीव्ही 9 मराठीवर थोडक्यात वाचू शकता. आज औरंगाबाद, नाशिक आणि नागपूर शहरातील महत्वाच्या बातम्या आपण इथे वाचू शकणार आहात.  ( 3 big cities and 4 important news in Maharashtra)

नाशिक :

नाशिक महापालिका निवडणुकीचासाठी भाजप आणि मनसेनं शड्डू ठोकल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसनंही जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून बैठकांची मोहीम हाती घेण्यात आली आहे. येत्या 10 दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी 31 प्रभागांमध्ये बैठका घेणार आहेत. या बैठकीत संभाव्य उमेदवारांची चाचपणी केली जाणार आहे. राज्यात महाविकास आघाडीच्या बॅनरखाली राष्ट्रवादी शिवसेना आणि काँग्रेससोबत असली तर नाशिक महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचे संकेत अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी यापूर्वीच दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी संपूर्ण नाशिक शहर पिंजून काढणार आहे.

नागपूर :

भाजपची विद्यार्थी संघटना असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं 66वं राष्ट्रीय अधिवेशन 25 आणि 26 डिसेंबरला नागपुरात होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या अधिवेशनाला देशभरातून फक्त 80 पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तर देशभरातील 4 हजार ठिकाणांवरून 15 हजार कार्यकर्ते ऑनलाईन पद्धतीने या कार्यक्रमाला उपस्थिती लावणार आहेत. 25 डिसेंबर रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर कार्यवाह भय्याजी जोशी यांच्या हस्ते या अधिवेशनाचं उद्घाटन होईल. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या या अधिवेशनात 4 महत्वाचे प्रस्ताव ठेवले जाणार आहे. त्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची त्वरित अंमलबजावणी करणे, राष्ट्रीय स्थिती, आत्मनिर्भर भारत, कोरोना आणि भारत या प्रस्तावांचा समावेश असणार आहे.

औरंगाबाद :

केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजिजू आज औरंगाबाद शहराच्या दौऱ्यावर आहेत. दुपारी 1 वाजता रिजिजू यांच्या औरंगाबाद दौऱ्याला सुरुवात होणार आहे. या दौऱ्यात ते स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाच्या विविध विकासकामांचं उद्घाटन करणार आहेत. तसंच स्विमिंग पूल ऑडिटोरियम आणि मैदानांचंही उद्घाटनही त्यांच्या हस्ते होणार आहे.

नागपूर :

नागपूर पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडी आणि पर्यायानं काँग्रेसचे उमेदवार अभिजित वंजारी यांचा मोठा विजय झाला आहे. त्यानंतर आता काँग्रेस नाशिक जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. त्यासाठी काँग्रेसनं निरीक्षकांची नेमणूक केली आहे. 2021 मध्ये नागपूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या काही निवडणुका होणार आहेत. त्यासाठी काँग्रेसनं निरीक्षकांची नेमणूक केली आहे. अनुभवी आणि युवा नेत्यांवर त्यांनी निरीक्षक पदाची जबाबदारी सोपवली आहे.

संबंधित बातम्या:

बाळासाहेब सानपांच्या ‘घरवापसी’नंतर शिवसेनेचाही पक्षप्रवेशाचा धडाका!

ग्रामपंचायतीसाठी ऑनलाईन अर्ज बंधनकारक, गावपुढाऱ्यांची कसोटी!

3 big cities and 4 important news in Maharashtra

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.