गडचिरोलीत भीषण अपघातानंतर 30 तास आंदोलन

गडचिरोली: एसटी बस आणि ट्रकच्या अपघातात चौघांचा जीव गेल्यानंतर, आक्रमक झालेल्या गावकऱ्यांनी तब्बल 30 तासानंतर आपलं आंदोलन मागे घेतलं. एटापल्ली  तालुक्यातील गुरपल्ली गावाजवळ एसटी बस आणि ट्रकच्या अपघातात चार प्रवाशांना प्राण गमवावे लागले. तर 11 प्रवासी गंभीर जखमी झाले. त्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी मुख्य चौकात तीस तास रस्त्यावर येऊन आंदोलन केलं. अखेर मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदतीचं …

गडचिरोलीत भीषण अपघातानंतर 30 तास आंदोलन

गडचिरोली: एसटी बस आणि ट्रकच्या अपघातात चौघांचा जीव गेल्यानंतर, आक्रमक झालेल्या गावकऱ्यांनी तब्बल 30 तासानंतर आपलं आंदोलन मागे घेतलं. एटापल्ली  तालुक्यातील गुरपल्ली गावाजवळ एसटी बस आणि ट्रकच्या अपघातात चार प्रवाशांना प्राण गमवावे लागले. तर 11 प्रवासी गंभीर जखमी झाले. त्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी मुख्य चौकात तीस तास रस्त्यावर येऊन आंदोलन केलं. अखेर मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदतीचं आश्वासन प्रशासनाकडून मिळाल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं.

सुरजागड प्रकल्पालाच्या वाहनांमुळे इथे अपघात वाढल्याचा आरोप आहे. या प्रकल्पाच्या कंपनीने नुकसान भरपाई देण्याची  मागणी गावकऱ्यांनी केली.

गावकऱ्यांच्या या आंदोलनाला राष्ट्रवादीचे माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम आणि आदिवासी विघार्थी संघटनेचे सर्व्हेसर्वा माजी आमदार दीपक आत्राम, जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी पाठिंबा दिला होता. मृतांच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपये आणि जखमींना 10 लाख रुपये लांयड मेटल कंपनीने द्यावेत, अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात येत होती.

अखेर प्रशासनाने तडजोड करुन काही मागण्या मान्य केल्या. पालकमंत्री राजे अमरिशराव आत्राम, जिल्हाधिकारी शेखर सिंह तसेच पोलीस अधीक्षक शैलेश बडकवडे  यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. त्यानंतर मृतांच्या नातेवाईकांना 25 लाख आणि जखमींना उपचारासाठी आवश्यक तो सर्व खर्च देण्यात येईल अशी ग्वाई पालकमंत्र्यांनी दिली.

दुसरीकडे या अपघात आणि आंदोलनाची माहिती मिळताच गडचिरोलीवरुन शिवसैनिकांनीही घटनास्थळी धाव घेतली. शिवसेना जिल्हाप्रमुख विजय श्रुंगारपवार आणि शिवसेना पदधिकारऱ्यांनी एटापल्ली तालुक्याला भेट दिली. त्यानंतर आज शिवसेनेचे आमदार बाळू धानोरकर यांनीही इथे हजेरी लावली.

सुरजागड प्रकल्पाला नियम धाब्यावर बसवून परवानगी देण्यात आली असून, ही परवानगी रद्द करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेची आहे. शिवाय एटापल्ली तालुक्यातच प्रकल्प उभारण्यात यावा असंही त्यांचं म्हणणं आहे.

दरम्यान, आज गडचिरोली-चिमूरचे खासदार अशोक नेते यांनी जखमींची भेट घेतली.

राष्ट्रवादीचे माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांची मागणी

राष्ट्रवादीचे माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी जोपर्यंत चौपदरी रस्ता होणार नाही, तोपर्यंत प्रकल्प बंद ठेवावा अशी मागणी केली. तसंच मृतांच्या नातेवाईकांना सरकारी मदत न मिळाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला.

आदिवासी विघार्थी संघटनेचे नेते माजी आमदार दीपक आत्राम यांची मागणी

आतापर्यंत सुरजागड प्रकल्पाच्या ट्रकमुळे वेगवेगळ्या अपघातात 16 लोकांचा जीव गेला आहे. या सर्वांच्या नातेवाईकांना शासनाने लांयड मेटल कंपनीकडून नुकसान भरपाई म्हणून 25 लाख रुपये द्यावे, अशी मागणी आदिवासी विघार्थी संघटनेचे नेते माजी आमदार दीपक आत्राम यांनी मागणी केली.  

आदिवासी जनतेचा, एटापल्ली गावकऱ्यांचा इतका विरोध असूनही हा प्रकल्प का सुरु आहे, असा प्रश्न आहे. गावकऱ्यांनी ट्रक जाळल्यामुळे, भीतीने सुरजागड पहाडीवर लोह खनिजाचा कच्चा माल भरलेले 50 ते 60 ट्रक दोन दिवसापासून वाट बघत आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *