बुलडाण्यात नाकाबंदी, कारमधून साडेचार लाखांची कॅश जप्त

बुलडाणा : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाकेबंदी दरम्यान खामगाव परिसरात 4 लाख 49 हजार रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. घाटपुरी नाका येथे नाकाबंदी दरम्यान ही कारवाई करण्यात आली. स्थिर संरक्षण पथकाने ही रक्कम जप्त केली आहे. ही रक्कम शासकीय कंत्राटदार सुरेश जाधव आणि गाडीचा चालक राजू जायभाये याच्याकडून जप्त करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेली …

, बुलडाण्यात नाकाबंदी, कारमधून साडेचार लाखांची कॅश जप्त

बुलडाणा : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाकेबंदी दरम्यान खामगाव परिसरात 4 लाख 49 हजार रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. घाटपुरी नाका येथे नाकाबंदी दरम्यान ही कारवाई करण्यात आली. स्थिर संरक्षण पथकाने ही रक्कम जप्त केली आहे. ही रक्कम शासकीय कंत्राटदार सुरेश जाधव आणि गाडीचा चालक राजू जायभाये याच्याकडून जप्त करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेली रक्कम निवडणूक विभागाकडे पुढील कारवाईसाठी सोपवण्यात आली आहे.

लोकसभा निवडणूक असल्याने बुलडाणा जिल्ह्यात ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. याच नाकाबंदी दरम्यान खामगाव येथे पथकाला शंका आल्याने इंडिका गाडी चालकांची चौकशी केली आणि या चौकशीदरम्यान पथकाला इंडिका कारमधून 4 लाख 49 हजार रुपये घेऊन जाताना पथकाने पकडले. या संदर्भात निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून चौकशी केली आणि पकडलेले पैसे संपूर्ण चौकशी होईपर्यंत ट्रेझरीमध्ये जमा केले असल्याचे सांगितले.

ही रक्कम बुलडाणा येथील जिजामाता महिला नगारी बँकेकडून आणि आदित्य अर्बन पतसंस्था येथून जळगाव जामोदकडे जात होते. अशी माहिती गाडी चालकाने पोलिसांना दिली. शिवाय हे पैसे कुठल्या उमेदवाराचे आहेत का? किंवा कोणत्या मतदारसंघात कुठे पैसे वाटायला चालले आहेत का?, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. सध्या यावर पोलीस आणि निवडणूक आयोगाचे अधिकारी अधिक चौकशी करत आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी पोलीस आणि निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून महत्त्वाच्या मार्गांवर नाकाबंदी करण्यात येत आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात पैशांचा गैरवापर करण्यात येतो. यावर आळा बसण्यासाठी नाकाबंदी करण्यात येते.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *