AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रवीण पोटेंच्या महाविद्यालयात विजेचा शॉक लागून चौघांचा मृत्यू; अमरावतीत खळबळ

भाजपचे नेते आणि माजी राज्यमंत्री आमदार प्रवीण पोटे यांच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात आज दुर्देवी घटना घडली. महाविद्यालयात रंगरंगोटी करत असताना चार कर्मचाऱ्यांना शॉक लागल्याने या कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला.

प्रवीण पोटेंच्या महाविद्यालयात विजेचा शॉक लागून चौघांचा मृत्यू; अमरावतीत खळबळ
amravati college
| Edited By: | Updated on: Dec 29, 2021 | 2:48 PM
Share

अमरावती: भाजपचे नेते आणि माजी राज्यमंत्री आमदार प्रवीण पोटे यांच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात आज दुर्देवी घटना घडली. महाविद्यालयात रंगरंगोटी करत असताना चार कर्मचाऱ्यांना शॉक लागल्याने या कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे या परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

अमरावतीत प्रवीण पोटे यांचं पीआर पोटे इंजिनीयरिंग महाविद्यालय आहे. या महाविद्यालयातील कर्मचारी महाविद्यालयाच्या मुख्य गेटची रंगरंगोटी करत होते. या गेटजवळून हायपॉवरची वायर गेली आहे. हे कर्मचारी शिडीवर चढून रंगरंगोटी करत असताना शिडीला विद्यूत तारेचा स्पर्श झाला. त्यामुळे त्यांना भयंकर शॉक लागला. त्यामुळे हे चारही कर्मचारी शिडीला चिकटले. त्यानंतर जोराचा झटका बसल्याने हे चारही कर्मचारी खाली कोसळले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यातील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एकाचा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. त्यामुळे या परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

बाहेरून मजूर न बोलावता शिपायांनाच कामाला लावले

या दुर्देवी घटनेत अक्षय सावरकर (वय 26), प्रशांत शेलोरकर (वय 31), संजय दंडनाईक (वय 45) आणि गोकुळ वाघ (वय 29) असे चारही कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. ते चौघेही याच कॉलेजमध्ये शिपाई पदावर कार्यरत होते. कॉलेज प्रशसनाने बाहेरुन मजूर न बोलावता थेट कॉलेजमधील कर्मचारीच कॉलेजच्या गेटच्या रंगरोटीसाठी लावल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. रंगरंगोटी करण्यासाठी लोखंडी शिडीवर सर्व जण चढले असता वरून विजेच्या तारा असल्याने या तारेचा धक्का लागल्याने चारही जणांना जोरदार शॉक लागला. त्यात तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर एकाचा रुग्णालयात मृत्यू झाला.

गुन्हा दाखल करण्याची मागणी

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. चारही मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले असून हे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात येत असल्याचं सूत्रांनी सांगितलं. या प्रकरणी हलगर्जीपणा करणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे.

मृतांची नावे

अक्षय सावरकर (वय 26) प्रशांत शेलोरकर (वय 31) संजय दंडनाईक (वय 45) गोकुळ वाघ (वय 29)

संबंधित बातम्या:

Video| नारायण राणेंना कणकवली पोलिसांची नोटीस; 3 वाजता हजर राहण्याचे आदेश

12 आमदारांची नियुक्ती कुणामुळे लटकली?, केंद्रातील कोणत्या खात्याचा राज्यपालांवर दबाव; संजय राऊतांचं मोठं विधान

Video | अंकिता हर्षवर्धन पाटील बनली ठाकरेंची सून! लग्नाला कुणाकुणाची हजेरी? पाहा

Follow Us
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Abhijeet Dipke | शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या...
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या भेटीला
दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
मारो... मारो! दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
Ram Mandir Case : अयोध्या राम मंदिर दान चोरी प्रकरण, SIT तपासाबद्दल महत्वाची अपडेट.

Ram Mandir Case : अयोध्या राम मंदिर दान चोरी प्रकरण, SIT तपासाबद्दल महत्वाची अपडेट

Horoscope Today 22nd July 2026 : आज या राशींसाठी मोठी सुवर्णसंधी, फक्त एक चूक टाळा.. वाचा मेष ते मीनचं राषीभविष्य !.

Horoscope Today 22nd July 2026 : आज या राशींसाठी मोठी सुवर्णसंधी, फक्त एक चूक टाळा.. वाचा मेष ते मीनचं राषीभविष्य !

आम्ही तुमच्यासोबत शेवटपर्यंत आहोत काळजी करु नका, जंतरमंतरवर दाखल होत उद्धव ठाकरे यांचा अभिजीत दीपके यांना दिलासा.

आम्ही तुमच्यासोबत शेवटपर्यंत आहोत काळजी करु नका, जंतरमंतरवर दाखल होत उद्धव ठाकरे यांचा अभिजीत दीपके यांना दिलासा

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने  गाण्याचा टीझर पुढे ढकलला….

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने गाण्याचा टीझर पुढे ढकलला…

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक.

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!.

CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!