कौतुकास्पद! मध्य रेल्वेकडून 477 हरवलेल्या/घरातून पळालेल्या मुलांची सुटका, पालकांशी पुन्हा घडवली भेट

प्रशिक्षित रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांना ते प्लॅटफॉर्मवर किंवा रेल्वे स्थानकांजवळ किंवा कधी कधी गाड्यांमध्येही फिरताना आढळले. अनेक पालक रेल्वेच्या या उत्कृष्ट सेवेबद्दल मनापासून कृतज्ञता आणि आभार व्यक्त करतात.

कौतुकास्पद! मध्य रेल्वेकडून 477 हरवलेल्या/घरातून पळालेल्या मुलांची सुटका, पालकांशी पुन्हा घडवली भेट
Central Railway

मुंबईः रेल्वे सुरक्षा दलाने (RPF) गेल्या 7 महिन्यांत मध्य रेल्वेवरील स्थानकांच्या रेल्वे प्लॅटफॉर्मवरून 477 मुलांना शोधले/सोडवले आणि त्यांच्या पालकांशी पुन्हा भेट घडवून आणली. यामध्ये मध्य रेल्वेवरील रेल्वे स्थानकांच्या प्लॅटफॉर्मवरील 310 मुले आणि 167 मुलींचा समावेश आहे आणि चाईल्डलाईन सारख्या स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने त्यांच्या पालकांशी पुन्हा एकत्र आणण्यात आले.

कधी कधी ते गाड्यांमध्येही फिरताना आढळले

दरम्यान, त्यातील बरेच जण काही भांडणे किंवा काही कौटुंबिक समस्यांमुळे किंवा चांगल्या आयुष्याच्या किंवा ग्लॅमरच्या शोधात, त्यांच्या कुटुंबीयांना न कळवता रेल्वे स्टेशनवर आले होते. प्रशिक्षित रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांना ते प्लॅटफॉर्मवर किंवा रेल्वे स्थानकांजवळ किंवा कधी कधी गाड्यांमध्येही फिरताना आढळले. अनेक पालक रेल्वेच्या या उत्कृष्ट सेवेबद्दल मनापासून कृतज्ञता आणि आभार व्यक्त करतात.

आरपीएफ आणि फ्रंटलाईन स्टाफचे केले कौतुक

मध्य रेल्वे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी म्हणाले की, मध्य रेल्वे पळून गेलेल्या मुलांशी संपर्क साधून त्यांच्या समस्या समजून घेऊन आणि त्यांच्या कुटुंबासोबत जाण्यासाठी समुपदेशन करून सामाजिक जबाबदारीची भूमिका बजावते. त्यांनी आरपीएफ आणि फ्रंटलाईन स्टाफचे कौतुक केले जे अशा प्रकरणांतील गांभीर्य ओळखून आणि समुपदेशक म्हणून त्वरित कारवाई करून महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.

लोकमान्य टिळक टर्मिनसदरम्यान एकटी प्रवास करताना आढळली

मध्य रेल्वेत केवळ जुलै 2021 मध्ये 73 मुलांची (47 मुले आणि 26 मुली) सुटका करण्यात आली आणि त्यांच्या पालकांसोबत पुन्हा एकत्र आणण्यात आले. यापैकी एका प्रकरणात 24 जुलै 2021 रोजी साधारण 11 वाजता कर्तव्यावरील ट्रेन तिकीट परीक्षक (टीटीई) नरेंद्र मिश्रा यांना एक 17 वर्षांची अल्पवयीन मुलगी ट्रेन क्र. 03201 मध्ये कल्याण आणि लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान एकटी प्रवास करताना आढळली. लोकमान्य टिळक टर्मिनसवर पोहोचल्यावर टीटीईने तिला ड्युटीवर असलेल्या महिला आरपीएफ आणि चाईल्डलाइन संस्थेच्या शारदा कांबळे यांच्याकडे सोपवले.

कोणालाही न सांगता ती घरातून पळून आली

चाईल्डलाईन कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत आरपीएफ उपनिरीक्षक बबलू कुमार यांनी तीची चौकशी केली असता तीने तिचे नाव शीतल (नाव बदलले आहे) असल्याचे सांगितले. ती बिहारच्या पाटणा येथे राहते आणि मुंबईत मॉडेलिंग/अभिनयामध्ये करिअर करण्यासाठी कोणालाही न सांगता घरातून पळून आली असल्याचेही तिने सांगितले. पुढील कारवाईसाठी चाईल्डलाईन कर्मचारी शारदा कांबळे आणि महिला आरपीएफ कॉन्स्टेबल पूनम तिवारी यांनी या मुलीला डोंगरीतील बालसुधार गृह यांच्याकडे सुपूर्द केले.

महिला कॉन्स्टेबल यांना हडपसर रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्मवर ती सापडली

दुसऱ्या एका घटनेत मेहबूबनगर जिल्ह्यातील 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी तिच्या आईने तिला फटकारल्यानंतर घरातून पळून विशेष ट्रेन क्र. 06524 निजामुद्दीन- पुणे यशवंतपूर एक्सप्रेस या गाडीने आली. आरपीएफ कॉन्स्टेबल शशिकांत जाधव आणि महिला कॉन्स्टेबल यांना 14 जुलै 2021 रोजी हडपसर रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्मवर ती सापडली. चौकशी केल्यावर मुलीने तिचे नाव गीतांजली (नाव बदलले) असल्याचे उघड झाले, ती फक्त तेलगू बोलू शकते. तिने दिलेल्या नंबरवर तिच्या काकांशी संपर्क साधला. त्यानंतर आरपीएफ कॉन्स्टेबल जाधव आणि लेडी कॉन्स्टेबल यांनी पुढील कारवाईसाठी मुलीला साथी एनजीओकडे सोपवले.

मध्य रेल्वेवर जानेवारी ते जुलै 2021 पर्यंत बचावलेल्या मुलांचे विभागवार विभाजन

मुंबई विभाग 166 मुले (104 मुले आणि 62 मुली). भुसावळ विभाग 70 मुले (39 मुले आणि 31 मुली). नागपूर विभाग 40 मुले (22 मुले आणि 18 मुली). पुणे विभाग 171 मुले (130 मुले आणि 41 मुली). सोलापूर विभाग 30 मुले (15 मुले आणि 15 मुली).

संबंधित बातम्या

Post Office ची ढासू योजना, 1400 रुपयांच्या प्रीमियमवर 35 लाख मिळणार, जाणून घ्या

डी-मार्टचे संस्थापक राधाकृष्ण दमानींचा जगातील 100 श्रीमंतांमध्ये समावेश, 1.42 लाख कोटींचे मालक

477 missing / runaway children released from Central Railway, reunited with parents

Published On - 7:15 pm, Thu, 19 August 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI