गडचिरोलीत अपघातात 5 प्रवासी जागीच ठार, संतप्त ग्रामस्थांनी 20 ट्रक पेटवले!

गडचिरोली : एसटी बस आणि ट्रकच्या अपघातात पाच प्रवासी जागीच ठार झाल्याची हृदयद्रवक घटना गडचिरोलीत घडली आहे. गडचिरोलीच्या एटापल्ली तालुक्यातील गुरपल्ली मार्गावर हा अपघात घडला. या अपघातामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी तब्बल 20 ट्रकना आग लावून पेटवून दिले. नेमकं काय घडलं? एटापल्ली तालुक्यातील गुरपल्ली मार्गावर एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. यात पाच प्रवासी जागीच …

गडचिरोलीत अपघातात 5 प्रवासी जागीच ठार, संतप्त ग्रामस्थांनी 20 ट्रक पेटवले!

गडचिरोली : एसटी बस आणि ट्रकच्या अपघातात पाच प्रवासी जागीच ठार झाल्याची हृदयद्रवक घटना गडचिरोलीत घडली आहे. गडचिरोलीच्या एटापल्ली तालुक्यातील गुरपल्ली मार्गावर हा अपघात घडला. या अपघातामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी तब्बल 20 ट्रकना आग लावून पेटवून दिले.

नेमकं काय घडलं?

एटापल्ली तालुक्यातील गुरपल्ली मार्गावर एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. यात पाच प्रवासी जागीच ठार झाले. ज्या ट्रकने एसटी बसला धडक दिली, ते ट्रक एका मेटल कंपनीसाठी वापरला जात होता. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी या मेटल कंपनीवर रोष काढला आणि प्रकल्पातून येत असलेल्या 27 ट्रकना थांबवून त्यातील 20 ट्रकाना आग लावली.

ज्या गावातील पाच जण या अपघातात मृत्यूमुखी पडले, त्या गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं. संतप्त नागरिकांनी पाचपैकी एकाचा मृतदेह मुख्य चौकात ठेवून आंदोलन सुरु केलं. संतप्त ग्रामस्थांनी कंपनी विरोधात घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलनही केलं.

या आगीच्या दुर्घटनेत 20 ट्रक जळून खाक झाले असून, अल्लापल्ली-एटापल्ली मार्गावरील झाडांनाही या आगीची झळ बसली. त्यामुळे अल्लापल्ली-एटापल्ली मार्गही सकाळपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *