...तर पोलिसांचीच 500 रुपयांची पावती फाडणार

नियम मोडल्यास पोलिसांना दंड झाल्याची उदाहरणे तशी तुरळकच. मात्र, आता सोलापूरच्या पोलीस आयुक्तांनी काढलेल्या एका आदेशामुळे पोलिसांनाही दंड भरावा लागणार आहे.

...तर पोलिसांचीच 500 रुपयांची पावती फाडणार

सोलापूर : नियम मोडल्यास नागरिकांना दंड झाल्याचे आपण नेहमीच ऐकतो. मात्र, नियम मोडल्यास पोलिसांना दंड झाल्याची उदाहरणे तशी तुरळकच. मात्र, आता सोलापूरच्या पोलीस आयुक्तांनी काढलेल्या एका आदेशामुळे पोलिसांनाही दंड भरावा लागणार आहे. कामावर असताना मोबाईल वापरणे पोलिसांनाही महागात पडणार आहे.

सोलापूरचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी काढलेल्या आदेशानुसार, पोलिसांना कामावर असताना मोबाईल वापरण्यास मनाई आहे. जर कोणताही पोलीस कर्मचारी कर्तव्यावर असताना मोबाईल वापरताना आढळला, तर त्याला 500 दंड होणार आहे. त्यामुळे आता नागरिकांबरोबरच पोलिसांनाही नियमांचे पालन करावे लागणार आहे.

सोशल मीडियाच्या काळात कामाच्या वेळेतही मोबाईलमध्ये डोकं घालून बसलेल्या कर्मचारी सर्रास पहायला मिळतात. त्याचा फटका केवळ खासगी उद्योगालाच नाही, तर सरकारी खात्यांमध्येही बसतो. खासगी क्षेत्रात सरकारी विभागाच्या तुलनेत लवकर उपाययोजना केली जाते. मात्र, सरकारी विभागात असा धोरणात्मक निर्णय घेण्याचे प्रमाण अगदीच नगण्य. नागरिकांच्या सोयीसाठी असलेल्या सरकारी विभागांमध्ये आपल्या कामासाठी नागरिक तासंतास ताटकाळत उभे राहतात. मात्र, कुणीही त्यांना दाद देत नाही. अशावेळी असे निर्णय नक्कीच उपयोगाचे ठरतील, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.

पोलीस आयुक्त शिंदे यांनी काढलेला आदेश सोलापूर शहरातील सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी, अधिकारी, सर्व शाखेचे प्रभारी अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी हा कार्यालयीन आदेश काढण्यात आला आहे. पोलीस आयुक्तालयातील पोलीस हे  कामावर असताना सतत मोबाईल बघत असतात किंवा मोबाईलवर बोलत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे त्यांचे कामातही लक्ष राहत नाही. त्यामुळे कामावर असताना मोबाईलवरील बोलण्यावर आळा बसावा यासाठी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी हा आदेश काढला.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *