सायन रुग्णालयात निवासी डॉक्टरने स्वत:ला संपवले, भुलीचे इंजेक्शन टोचले

लोकमान्य टिळक रुग्णालयात एका निवासी डॉक्टराने स्वत:ला संपवल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात पोलिस अधिक तपास करत आहेत.

सायन रुग्णालयात निवासी डॉक्टरने स्वत:ला संपवले, भुलीचे इंजेक्शन टोचले
sion hospital news
| Updated on: Oct 11, 2026 | 4:27 PM

मुंबईतील प्रसिद्ध लोकमान्य टिळक रुग्णालयातील ( सायन रुग्णालय ) एका निवासी डॅाक्टरने जीवन संपवल्याची घटना घडली आहे. या डॉक्टरचे नाव शिवचरण आप्पा पाटील असे आहे. या निवासी डॉक्टरने ॲनास्थेशियाचा ओव्हरडोस घेऊन स्वत:चे जीवन संपवल्याचे उघडकीस आहे आहे. हॉस्टेलमधील त्यांच्या रुमच्या बाथरुममध्ये शिवचरण याचा मृतदेह सापडला आहे.

निवासी डॅाक्टरांच्या आत्महत्येने लोकमान्य टिळक रुग्णालयामध्ये खळबळ उडाली आहे. याआधी जे.जे. रुग्णालयाच्या एका डॅाक्टरने आत्महत्या केली होती. आता लोकमान्य टिळक हॅास्पिटलमधील डॅाक्टराच्या आत्महत्येमुळे वैद्यकीक विश्वात खळबळ उडाली आहे.

Loading...

मुंबईतील लोकमान्य टिळक रुग्णालयात पदव्युत्तर शिक्षण घेणारे निवासी डॉक्टर शिवचरण आप्पा पाटील यांचा मृतदेह रुग्णालयाच्या वसतिगृहातील खोलीच्या बाथरूममध्ये आढळला. त्यांनी ॲनास्थेशियाच्या ओव्हरडोस घेतला असावा असा संशय व्यक्त केला जात असला, तरी मृत्यूचे नेमके कारण पोस्टमार्टेमनंतरच बाहेर येईल असे म्हटले जात आहे. मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

सायन येथील प्रसिद्ध लोकमान्य टिळक रुग्णालयातील एका निवासी डॉक्टरने जीवन संपवण्याची घटना घडली आहे. या डॉक्टरने स्वत: अॅनेस्थेशियाचा ओव्हर डोस घेऊन स्वत:ला संपवल्याचे सांगण्यात येत आहे. शिवचरण पाटील हा सर्जरी विभागात पदव्युत्तरच्या पहिल्या वर्षात शिकत होता. त्याचा मृतदेह हॉस्टेलमधील रुममध्ये आढळला. शिवचरण पाटील हा सर्जरी विभागात पदव्युत्तरच्या पहिल्या वर्गात शिकायला होता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us