AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दोघांची इन्स्टावर ओळख, समलैंगिक संबंध! पण सतीशच्या पत्नीबद्दल कळताच… सूरजचं हादरुन टाकणारं कांड

सूरज आणि सतीशकुमार यांची इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ओळख झाली. हळूहळू त्यांच्या मैत्रिचे रुपांतर नात्यात झाले. पण सतीश हा विवाहीत असल्याचे कळताच सूरजने टोकाची भूमिका घेतली. नेमकं काय घडलं?

दोघांची इन्स्टावर ओळख, समलैंगिक संबंध! पण सतीशच्या पत्नीबद्दल कळताच... सूरजचं हादरुन टाकणारं कांड
सूरज हलदारImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Jun 01, 2026 | 1:30 PM
Share

देशात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीचे सत्र वाढत चालले आहे. कधी प्रेमसंबंधांमध्ये मिळालेल्या धोक्यातून तर कधी विवाहबाह्य संबंधांमधून अनेक भयानक घटना घडल्या आहेत. अशीच एक हादरुन टाकणारी घटना उघडकीस आली आहे. समलैंगिक संबंधातून एका तरुणाने आपल्या मित्राची निर्घृण हत्या केली आहे. लग्नास नकार दिल्याच्या रागातून आरोपीने धारदार चाकूने सपासप वार करत मित्राचा जीव घेतला. मित्राची हत्या केल्यानंतर आरोपी पळून जाण्याच्या तयारीत होता, मात्र स्थानिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्यात आरोपीला बेड्या ठोकल्या असून त्याची कसून चौकशी केली जात आहे.

इन्स्टावर झाली ओळख

सूरज हलदार असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे, तर सतीशकुमार निसाद असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. दोघेही मागील काही दिवसांपासून समलैंगिक रिलेशनशिपमध्ये होते. सूरजला सतीशकुमारसोबत लग्न करायचे होते. मात्र सतीशने लग्नास नकार दिला. याच रागातून हे हत्याकांड घडले. ही घटना गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यात देवदा गावाजवळ घडली.

काही महिन्यांमध्येच प्रेमसंबंध

मिळालेल्या माहितीनुसार, सतीशकुमार निसाद हा अहेरी जवळील नागेपल्ली येथील रहिवासी असून त्याचा गॅरेजचा व्यवसाय होता. तर आरोपी सूरज हलदार हा ओडिशा राज्यातील नबरंगपूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. या दोघांची काही महिन्यांपूर्वी ‘इन्स्टाग्राम’वर ओळख झाली होती. या ओळखीचे रूपांतर आधी मैत्रीत आणि नंतर दोघांमधील समलैंगिक प्रेमसंबंधांत झाले. मात्र, सतीशकुमार हा आधीच विवाहित असल्याची माहिती जेव्हा आरोपी सूरजला समजली, तेव्हापासून या दोघांमध्ये सातत्याने वाद होऊ लागले.

मित्राचीच हत्या

आरोपी सूरज हलदार हा दोन दिवसांपूर्वीच सतीशकुमारला भेटण्यासाठी ओडिशाहून नागेपल्ली येथे आला होता. त्यानंतर रविवारी पहाटेच्या सुमारास सतीशकुमार हा आरोपी सूरजला परत ओडिशामध्ये सोडण्यासाठी आपल्या चारचाकी गाडीने निघाला होता. गाडी एटापल्ली तालुक्यातील देवदा गावाजवळ पोहोचली असता, दोघांमध्ये गाडीतच लग्नाच्या आणि विवाहबाह्य संबंधांच्या कारणावरून जोरदार वाद झाला. प्रचंड संतापलेल्या सूरजने आपल्यासोबत आणलेला धारदार चाकू काढून सतीशकुमारवर सपासप वार करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने अत्यंत क्रूरतेने सतीशकुमारचा गळा चिरून त्याची गाडीतच हत्या केली.

सतीशकुमार रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर आरोपी सूरज हलदार घटनास्थळावरून पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र, त्याचा संशयास्पद वावर पाहून स्थानिक नागरिकांनी तत्काळ त्याला जागीच पकडले आणि घटनेची माहिती पोलिसांना दिली. नागरिकांनी आरोपीला पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. सध्या हालेवारा पोलीस ठाण्याचे पथक या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.

Follow Us
बीडमध्ये उद्धव ठाकरेंची मोठी खेळी! 396 बूथप्रमुखांशी थेट संवाद
Uddhav Thackeray | बीडमध्ये उद्धव ठाकरेंची मोठी खेळी! 396 बूथप्रमुखांशी थेट संवाद; प्रत्येकासाठी 10 लाखांची पॉलिसी जाहीर
पक्षाच्या नावाचा दुरुपयोग करणाऱ्यांचा लवकरच निकाल लागेल ठाकरेंचा इशारा
Uddhav Thackeray | पक्षाच्या नावाचा दुरुपयोग करणाऱ्यांचा लवकरच निकाल लागेल! उद्धव ठाकरेंचा सज्जड इशारा
विनयभंग, जीवे मारण्याची धमकी; घरी 100 पुरुष पाठवतो म्हणाले!
Sanjay Gaikwad | विनयभंग, जीवे मारण्याची धमकी; घरी 100 पुरुष पाठवतो म्हणाले! संजय गायकवाडांविरोधात आरती आंबींची पोलिसांत तक्रार दाखल
पुण्याच्या पायाभूत सुविधांचा विकास आणि आधुनिक शहर निर्मितीचे फडणवीसांच
पुण्याला वेगवान गतिशीलता असलेलं शहर बनवणार
नागपुरात डीजेच्या आवाजावर पोलीस ॲक्शन मोडवर
नागपुरात डीजेवरील बंदीनंतर पहिली कारवाई
आंदोलक घोड्यावर बसून अंतरवालीत
आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठा आंदोलक घोड्यावर बसून अंतरवालीत
बापटांची मराठी ट्रेंडिंग-सीएम फडणवीस
'बापटांची मराठी ट्रेंडिंग,मला ट्यूशनच घ्यावी लागेल'-सीएम फडणवीस
शरद पवारांची भेट, लगेच सुनेत्रा पवारांची भेट! काकडेंच्या दौऱ्याने...
NCP | शरद पवारांची भेट, लगेच सुनेत्रा पवारांची भेट! विक्रम काकडेंच्या दौऱ्याने राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या चर्चांना वेग
बोगस SRA फॉर्म भरणं हाच मोदींनी दिलेला रोजगार! ठाकरेंचा भाजपवर घणाघात
Uddhav Thackeray | बोगस SRA फॉर्म भरणं हाच मोदींनी दिलेला रोजगार! उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात
दिशा सालियन प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही! ठाकरेंचं मोठं वक्तव्य
Aaditya Thackeray | दिशा सालियन प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही! आदित्य ठाकरेंचं मोठं वक्तव्य; राम कदमांचा थेट सवाल