आदित्य ठाकरेंचा धुळ्यात रोड शो, जन आशीर्वाद यात्रेचा दुसरा दिवस

युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या जन आशीर्वाद यात्रेचा दुसरा दिवस आहे. जळगावातून सुरु झालेली जन आशीर्वाद यात्रा आज धुळ्यात दाखल झाली.

आदित्य ठाकरेंचा धुळ्यात रोड शो, जन आशीर्वाद यात्रेचा दुसरा दिवस
Follow us
| Updated on: Jul 19, 2019 | 11:18 AM

धुळे : युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या जन आशीर्वाद यात्रेचा दुसरा दिवस आहे. जळगावातून सुरु झालेली जन आशीर्वाद यात्रा आज धुळ्यात दाखल झाली. यावेळी आदित्य ठाकरेंनी धुळे जिल्ह्यातून रोड शो काढला. यावेळी तरुणांची मोठी फौज दुचाकीसह या रोड शोमध्ये उपस्थित होती.

सकाळी साडेदहा वाजता धुळे जिल्ह्यातील दसेरा मैदानातून या रोड शोला सुरुवात झाली. आशीर्वाद रथयात्रेचा मार्ग मनोहर चित्र मंदिर येथून आग्रा रोड मार्गे खंडेराव बाजार पाच कंदील मार्गे राम मंदिरात दर्शन असा होता. यानंतर जय हिंद कॉलेजमधील विद्यार्थ्यांबरोबर आदित्य संवाद या कार्यक्रमातून ते तरुणांशी संवाद साधतील.

यानंतर गणपती मंदिराशेजारील अंध विद्यालयातील विद्यार्थ्यांनाही ते भेटणार आहेत. अंध विद्यार्थ्यांच्या भेटीनंतर धुळे जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे विजय संकल्प मेळाव्यात ते कार्यकर्त्यांशी संवाद साधून मालेगावला रवाना होणार आहेत.

मालेगाव बाजार समिती येथे विजय संकल्प मेळाव्यात दुपारी अडीच वाजता  शिवसेनेच्या कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधतील.

जळगावमध्ये संवाद

दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी काल पहिल्या दिवशी जळगावात शिवसैनिकांना संबोधित केलं.

“मी तुमच्या मनातील आवाज ऐकायला येथे आलो आहे. मला लोक आशीर्वाद द्यायला स्वत:हून उभे होते, तेच मी घ्यायला आलो आहे. तुमच्या समस्या समजून घेण्यासाठी ही यात्रा निघाली आहे. शिवसेना जनतेत आहे मी त्यांच्यासोबत आहे. जिथेजिथे अन्याय तिथे शिवसैनिक रस्त्यावर आहेत” असं आदित्य ठाकरे म्हणाले.

मला तुमची साथ हवी आहे मला संपूर्ण महाराष्ट्र भगवामय करायचा आहे. मला नवा महाराष्ट्र घडवायचा आहे.  मला तुम्ही वचन द्या आणि शिवसेना नावाचा जप करा. विरोधकांची मन जिंकायला आलो आहे, असं ते म्हणाले.

Non Stop LIVE Update
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.