Abhijeet Dipke : फक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी अभिजीत दीपके मुंबईत येत नाहीयत, त्याआडून सीजेपीचा मोठा डाव

Abhijeet Dipke : 2 ऑक्टोबरला कॉकरोच जनता पार्टी मुंबईत शिवाजीपार्कला आंदोलन करणार आहे. वरवर हे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन आहे असं दिसतय. पण तो एकमेव हेतू नाहीय.

Abhijeet Dipke : फक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी अभिजीत दीपके मुंबईत येत नाहीयत, त्याआडून सीजेपीचा मोठा डाव
Abhijeet Dipke
Image Credit source: PTI
| Updated on: Oct 01, 2026 | 8:43 PM

कॉकरोच जनता पार्टी उद्या 2 ऑक्टोबरला मुंबईत विरोध प्रदर्शन करणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी हे आंदोलन असलं, तरी या निमित्ताने CJP कडून इतरही मागण्या केल्या जाणार आहेत. सीजेपी संस्थापक अभिजीत दीपके या आंदोलनाचं नेतृत्व करणार आहे. निवडणूक आयोगातील मतभेद समोर आल्यानंतर विरोधी पक्ष आक्रमक झाले असून ते मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयोग देशहिताच काम करत नाही, असं सीजेपीचा आरोप आहे. दीपके आणि त्यांचे दोन सहकारी सौरव दास आणि आशुतोष रांका यांनी 25 सप्टेंबरच्या पत्रकार परिषदेत तीन मागण्या ठेवल्या होत्या. ज्ञानेश कुमार यांचा फक्त राजीनामाच नको, त्यांच्याविरोधा गुन्हेगारी कारवाई व्हावी अशी सीजेपीची मागणी आहे.

विशेष सखोल पुनरावलोकन SIR प्रक्रिया स्थगित करावी अशी सुद्धा सीजेपीची मागणी आहे. जानेवारी 2025 ची मतदार यादी कायम करावी अशी मागणी केली आहे. निवडणूक आयोगासाठी आणलेल्या 2023 च्या कायदा आणि सुधारणा रद्द कराव्या अशी मागणी केली आहे. नियोजित आंदोलन फक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी नाही हे यातून दिसून येतं.कॉकरोच जनता पार्टीच्या अन्य ज्या दोन मागण्या आहेत, त्यातून त्यांना आंदोलनाचा विस्तार तसचं निवडणूक आयोगाच्या कारभारावर देशव्यापी चर्चा घडवून आणायची आहे. अंतर्गत मतभेदाचं वृत्त निवडणूक आयोगाने फेटाळून लावलं आहे.

Loading...

पोलीस शिवाजी पार्कवर आंदोलनाची परवानगी का देत नाहीय?

सीजेपीला दादर शिवाजी पार्क येथे हे आंदोलन करायचं आहे. पण त्यासाठी मुंबई पोलिसांनी सीजेपीला परवानगी नाकारली आहे. सीजेपी मात्र आपल्या आंदोलनावर ठाम आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या 2013 च्या आदेशानुसार शिवाजी पार्क मैदानात आंदोलनाला परवानगी देण्याचा अधिकार त्यांच्याकडे नाहीय. त्या शिवाय पोलिसांनी सभांशी संबंधित नियम, वाहतूक व ध्वनी प्रदूषणाबाबतही चिंता व्यक्त केली. आंदोलनाला परवानगी नाकारणं हा आंदोलन दडपण्याचा प्रकार आहे असं अभिजीत दीपकेने म्हटलय. आंदोलनाचा अधिकार नाकारला तर जेल भरो आंदोलन करण्याचा इशारा अभिजीत दीपके यांनी दिला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us