Abhijeet Dipke : मला जेलमध्ये टाका, बाहेर आल्यावर फडणवीस साहेब मी तेच म्हणेन जे तुम्ही म्हणायचात…

Abhijeet Dipke : "तुमची खुर्ची फेविस्टिकने चिकटवलेली आहे. साहेब एक विनंती आहे, तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात. महाराष्ट्राला वारसा आहे. जिजाऊ, सावित्रीबाई फुले, शाहू आंबडेकर यांचा हा महाराष्ट्र आहे. तुम्ही विसरला असाल. आम्ही विसरलेलो नाही"

Abhijeet Dipke : मला जेलमध्ये टाका, बाहेर आल्यावर फडणवीस साहेब मी तेच म्हणेन जे तुम्ही म्हणायचात...
Abhijeet Dipke
| Updated on: Oct 02, 2026 | 5:39 PM

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांचं दादर शिवाजी पार्क मैदानात आंदोलन सुरु आहे. मोठ्या संख्येने जेन झी आणि अन्य आंदोलक इथे जमले आहेत. यावेळी बोलताना सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत बोचरी टीका केली. “देवेंद्र फडणवीस तुम्ही काय म्हणालेलात आंदोलनात चाललाय तर विचार करा, तीन दिवस जेलमध्ये रहावं लागेल. काय करणार तुम्ही ताब्यात घेणार. अजून काय करणार. देवेंद्र फडणवीस ऐकताय ना तुम्ही. आंदोलनाला जात असाल तर वितार करुन जा. तीन दिवस जेलमध्ये रहावं लागेल का?. तुम्हाला आमदार वाटले का घाबरत तुमच्याकडे पळत यायला” असं अभिजीत दीपके म्हणाले.

“तुमची खुर्ची फेविस्टिकने चिकटवलेली आहे. साहेब एक विनंती आहे, तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात. महाराष्ट्राला वारसा आहे. जिजाऊ, सावित्रीबाई फुले, शाहू आंबडेकर यांचा हा महाराष्ट्र आहे. तुम्ही विसरला असाल. आम्ही विसरलेलो नाही” असं दीपके बोलले. “या महाराष्ट्रात लहान लेकरांना धमक्या दिल्या जात नाहीत. तीन दिवस जेलमध्ये टाकणार टाका कोणकोण जाणार जेलमध्ये. फडणवीस जेलमध्ये तीन दिवस नको तीन महिने टाता. जेलमधून बाहेर आल्यावर मी तेच म्हणजे जे तुम्ही म्हणायचात मी पुन्हा येईन, पुन्हा येईन, पुन्हा येईन” असं दीपके म्हणाले.

Loading...

(बातमी अपडेट होत आहे)

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us