Abhijjeet Dipke : पोलिसांनी मुलींचे कपडे फाडले, प्रायव्हेट पार्टवर लाठ्या मारल्या; अभिजीत दीपके संतापले, मोदी सरकारला दिला मोठा इशारा
abhijeet dipke : दिल्ली पोलिसांच्या कुटुंबीयाचे आरोप दीपकेंनी फेटाळून लावले. तर पोलिसांनी आंदोलक मुलींचे कपडे फाडल्याचा आरोप केला.

जंतर-मंतरवरील आंदोलनावरून कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलक आणि सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. भाजपच्या नेत्यांनी कॉक्रोच जनता पार्टींच्या आंदोलकांवर गंभीर आरोप केला. दिल्लीत आंदोलनावेळी पोलिसांवर दगडफेकीचा आरोप केला. त्यानंतर आज शुक्रवारी पोलिसांच्या कुटुंबातील सदस्यांनी पुढे येऊन कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलकावर दगडफेकीचा आरोप केला. पोलिसांच्या कुटुंबातील सदस्यांचे आरोप अभिजीत दीपके यांनी फेटाळून लावले. तर जंतरमंतरवर दगडफेक करणारे भाजपचे गुंड होते. पोलीस कुटुंबाच्या आडून विद्यार्थ्यांना त्रास दिला जात आहे. आंदोलनाच्या वेळी पोलिसांनी मुलींचे कपडे फाडले. मुलींच्या प्रायव्हेट पार्टवर लाठ्या मारल्या. आम्हाला आणखी त्रास दिला तर आम्ही पुन्हा आंदोलन करू, असा इशारा अभिजीत दीपके यांनी दिला.
अभिजीत दीपके यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. दीपके म्हणाले, ‘जंतरमंतरच्या आंदोलनत भाजपच्या गुंडांनी शिरकाव केला. एका महिन्यांपासून आंदोलक आमच्यासोबत होता. आंदोलकांनी जंतरमंतरवर शांततापूर्वक आंदोलन केलं. तरुण-तरुणींनी कोणीही दगड हातात घेतलेला नाही. भाजपने आंदोलनात गुंड पाठवले होते. पोलिसांसोबत वाईट घडलं. जंतरमंतरवर दगडांनी भरलेला ट्रक होता. तो ट्रक कसा आला? त्याबाबत मी पोलिसांना विचारलं. तर त्यांनी दिल्ली महापालिकेचा ट्रक असल्याचे पोलिसांनी सांगितले. दगडांनी भरलेला ट्रक का होता? सर्व भाजपच्या प्लानिंगनुसार झालं आहे. भाजपच्या लोकांनी पोलिसांवर दगडफेक केली. आम्ही हिसेंच समर्थन करत नाही. आमचं आंदोलन हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांनी दाखवलेल्या मार्गावर चालणारं आंदोलन होतं’.
‘जंतरमंतरवर ज्यांनी दगडफेक केली, त्यांच्यावर कारवाई करू शकता. परंतु त्यांचा आधार घेऊन किंवा नाव घेऊन विद्यार्थ्यांना त्रास देताहेत, त्याचं काय? मुंबईच्या मुलांनी दिल्लीच्या विद्यार्थ्यांवर दगडफेक केली का? बिहारच्या मुलांनी दिल्ली पोलिसांवर दगडफेक केली का? पश्चिम बंगालच्या विद्यार्थ्यांनी दिल्ली पोलिसांवर दगडफेक केली का? त्यांचं नाव घेऊन विद्यार्थ्यांना त्रास दिला जात आहे. विद्यार्थ्यांवर पॅलेट गन चालवल्या आहेत. बिहारमध्ये विद्यार्थ्यांवर एके-47 चालवली आहे. पोलीस विद्यार्थ्यांवर एके-47 चालवण्यासाठी भरती झाले का? ज्या लोकांनी दगडफेक केली, त्यांना अटक करा. भाजपच्या गुंडानी 15 दिवसाआधी निशू नावाच्या मुलीच्या वडिलांचं डोके फोडले. याच पोलिसांनी भाजपच्या गुडांना अटक केली नाही. तेव्हा आम्ही कसं अटक करू, असे प्रत्युत्तर पोलिसांनी सांगितले. त्यानंतर सोशल मीडियावर धमकी दिल्या जात होत्या. सर्व गोष्टी पोलिसांसमोर झाल्या होत्या, असे दीपकेंनी पुढे सांगितले.
‘दिल्ली पोलीस शांत का आहे? लाठ्यांमध्ये खिळे होते, विद्यार्थ्यांवर पॅलेट गन चालवल्या लाजा वाटल्या नाहीत का? 10-12 वर्षांच्या मुलींचे कपडे फाडले. मुलींचे डोक्यात लाठ्या हाणल्या. आता पोलिसांचं कुटुंब समोर आणत आहात. पोलिसांनी मारहाण केलेल्याही मुलींचंही कुटुंब असेल ना…माझ्यावर जयपूरमध्ये एकाने मारहाण केली. त्याला सोडण्यात आलं. कारण तो संघाचा माणूस आहे. भाजपचे लोक उन्माद करतात, त्यावर तुम्ही कारवाई करतात. जर तुम्ही विद्यार्थ्यांना त्रास दिला, तर आम्ही पुन्हा आंदोलन करू. मुलींचं डोकं फोडलं. संदीप लांबा नावाच्या पोलीस अधिकाऱ्याने मुलीवर हात उचलला. पोलिसांनी मुलीच्या प्रायव्हेटवर पार्टवर लाठ्या मारल्या. आज कुटुंबांना पुढे करत आहेत. पोलिसांच्या सर्व कृत्य कॅमेऱ्यात कैद झालं आहे, असा आरोप दीपके यांनी केला.