मी 30 हजारांचे शूज वापरतो, अभिजीत दिपके यांचे थेट उत्तर, म्हणाले, विमानाने..

कॉकरोच जनता पार्टीकडून मुंबईमध्ये आजपासून आंदोलन केले जाणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात हे आंदोलन आहे. मात्र, यावेळी अभिजीत दिपके यांच्या 30 हजारांच्या शूजही चर्चा रंगताना दिसत आहे.

मी 30 हजारांचे शूज वापरतो, अभिजीत दिपके यांचे थेट उत्तर, म्हणाले, विमानाने..
Abhijit Dipke
| Updated on: Oct 02, 2026 | 7:11 AM

आज 2 ऑक्टोबर गांधी जयंती दिनी कॉकरोच जनता पार्टी आंदोलन करण्यावर ठाम आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर सीजेपीचं आंदोलन होणार आहे. पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली आहे. दुसरीकडे या आंदोलनाला स्थानिक नागरिकांनीही विरोध केला आहे. तरीही दिपके याच ठिकाणी आंदोलन करण्यावर ठाम आहेत. CJP जेलभरो आंदोलन करणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात सीजेपीचं आंदोलन असेल. मुंबईपासून आंदोलनाला सुरूवात होणार. दुसरीकडे दिल्ली पोलिसही अलर्ट मोडवर आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर अभिजीत दिपके यांच्याकडून मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन पुकारले. अनेक आरोप ज्ञानेश कुमार यांच्यावर करण्यात आलीत. त्यातच मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत.

अभिजीत दिपके यांना विचारण्यात आले की, तुम्हाला मिळणाऱ्या फंडिंगबद्दल विविध चर्चा रंगताना दिसत आहेत. या प्रश्नावर उत्तर देताना दिपकेंने म्हटले की, या प्रश्नात मला काही अर्थ दिसत नाही. शिवाजी पार्कातील आंदोलनाबद्दल अभिजीत दिपके यांना मिळणाऱ्या पैशांबद्दल विचारण्यात आले असता त्यांनी म्हटले की, निवडणुक आयोगातील पारदर्शकतेबद्दल बोलत आहात तर कॉकरोच जनता पार्टीला पैशा कुठून येतोय हे सांगू शकता?

Loading...

यावर अभिजीत दिपके यांनी म्हटले की, आम्हाला वाटते की, लोकांकडून पैसा येत आहे. मला माफ करा पण मला हा प्रश्नच योग्य वाटत नाही. आमची फंडिंग आणि निवडणूक आयोगाचा गलथान कारभार याचे काहीच देणे घेणे नाही. पुढे अभिजीत दिपके यांनी म्हटले की, माझ्या शूजची खूप जास्त चर्चा होत आहे. फोटोही व्हायरल होत आहे की, 30 हजारचे शूज घातलेत म्हणून. मला काही वाटत नाही याबाबत कारण मी 30 हजारांचे शूज घालण्यासाठी सक्षम आहे.

मी अमेरिकेला गेलो होतो. मी अमेरिकेला विमानाने गेलो होतो. मी मुंबईहून दिल्लीलाही विमानाने जातो. गेल्या काही दिवसांपासून सीजेपीला मिळणाऱ्या पैशांबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केली जात आहेत. त्यातच अभिजीत दिपके यांनी यावर भाष्य करणे टाळले. ज्ञानेश कुमार यांच्या विरोधातील आंदोलनाला आज सुरूवात होईल. सीजेपीला लोकांचा कसा पाठिंबा मिळतो हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us