Abhijit Dipke Health : अभिजीत दिपकेंची तब्येत अचानक बिघडली, नेमकं काय झालं? प्रकृतीबाबत डॉक्टरांची मोठी अपडेट

कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांची तब्येत अचानक बिघडली आहे, डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली असून, आता त्यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांकडून मोठी अपडेट देण्यात आली आहे.

Abhijit Dipke Health : अभिजीत दिपकेंची तब्येत अचानक बिघडली, नेमकं काय झालं? प्रकृतीबाबत डॉक्टरांची मोठी अपडेट
Abhijeet Deepke
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 01, 2026 | 2:56 PM

कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. शनिवारी अभिजीत दिपके हे छत्रपती संभाजीनगरमधील आपल्या निवासस्थानी पार्किंगमध्ये आपल्या समर्थकांसोबत संवाद साधत असतानाच त्यांना अचानक त्रास जाणवू लागला. मळमळ आणि उलट्यांचा त्रास सुरू झाला, त्यांचा बीपी देखील लो झाला, त्यानंतर तातडीने डॉक्टरांना बोलावण्यात आले. समोर आलेल्या माहितीनुसार अभिजीत दिपके हे आज सकाळी 11.45 वाजता त्यांना भेटण्यासाठी आलेल्या समर्थकांसोबत बोलत होते, याचवेळी त्यांना अचानक घबराट जाणवू लागली, मळमळ होऊ लागली, त्रास जाणवत असल्याने ते कोणाशीही न बोलता तसेच घरात निघून गेले. त्यानंतर त्यांचे वडील भगवान दिपके यांनी घरीच डॉक्टरांना बोलावलं. जेव्हा जंतर मंतरमध्ये कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू होतं, त्यावेळी अभिजीत दिपके यांना टायफाईडची लागण झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांची प्रकृती बिघडली आहे. दरम्यान डॉक्टरांनी तपासून आता अभिजीत दिपके यांच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट दिली आहे.

नेमकं काय म्हणाले डॉक्टर?

डॉक्टरांनी अभिजीत दिपके यांची तपासणी केली आहे, त्यानंतर त्यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टरांकडून मोठी अपडेट देण्यात आली आहे. सकाळपासून त्यांना मळमळ, उलटी सारखं फील होत होतं. सकाळी त्यांना दोन-तीन उलट्या झाल्या लूज मोशन पण झालं थोडासा बीपी लो होता, आपण त्यांना आय व्ही दिला आहे. पाच सहा वाजेपर्यंत आराम करण्याचा सल्ला दिला आहे. नाही कव्हर झालं तर रक्त तपासणी केली जाणार आहे. त्यांचा दिल्लीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता, नंतर त्याला निगेटिव्ह म्हणून दिलं होतं. तरी पण आपण एक रिपीट टेस्ट करण्याचा विचार करत आहोत. ऍडमिट करण्याची शक्यता कमी आहे, रिकव्हरी चांगली आहे, अशी माहिती डॉक्टरांनी अभिजीत दिपकेंच्या प्रकृतीबाबत दिली आहे.

अभिजीत दिपके यांनी कॉकरोच जनता पार्टीची स्थापना केली, फक्त सोशल मीडियावर असलेल्या या पार्टीला तरुणांचा चांगला प्रतिसाद मिळाला, त्यानंतर नीट पेपर फुटी प्रकरणात सीजेपीकडून धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती, त्यासाठी जंतर मंतरवर तब्बल एक महिना आंदोलन करण्यात आलं, त्यानंतर संसदेवर देखील मोर्चा काढण्यात आला होता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us