मोठी बातमी! काहीतरी मोठं घडणार, सुटका होताच अभिजीत दिपकेंच्या ट्विटने मोठी खळबळ, पोस्ट केला थेट तो फोटो अन्…
मोठी बातमी समोर येत आहे. कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांना अटक करण्यात आलं होतं. त्यांना आता जामीन मिळाला आहे. दरम्यान जामीन मिळताच आता दिपके यांनी एक ट्विट केलं आहे. या ट्विटमुळे चर्चेला उधाण आलं आहे.

मोठी बातमी समोर येत आहे. कॉकरोच जनता पार्टीचे नेते सौरभ दास आणि आशुतोष रांका यांना पोलिसांनी अटक केलं आहे. त्यांच्या अटकेच्या विरोधात शुक्रवारी सीजेपीच्या वतीने दिल्लीमध्ये मोठा मोर्चा काढण्यात येणार होता. परंतु या मोर्चाच्या आधीच पोलिसांनी कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांना ताब्यात घेतलं. त्यानंतर त्यांना अटक देखील करण्यात आली. दरम्यान आता दिपके यांना जामीन मंजूर झाला आहे. अभिजीत दिपके यांची जामिनावर सुटका होताच त्यांनी एक ट्विट केलं आहे. या ट्विटमुळे चर्चेला उधाण आलं आहे. अभिजीत दिपके यांची जामिनीवर सुटका झाली, त्यानंतर त्यांनी एक ट्विट केलं आहे. या ट्विटमुळे आता दिपके यांची पुढची दिशा नक्की काय असणार याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे.
दिपके यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर सौरभ दास आणि आशुतोष रांका या दोघांचा एक फोटो पोस्ट केला आहे. आता मी माझ्या या दोन भावाच्या सुटकेची वाट पाहत आहे, असं ट्विट दिपके यांनी केलं आहे. अभिजीत दिपके यांना काही अटी शर्तींसह जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे आता अभिजीत दिपके यांच्या आंदोलनाची पुढची दिशा नेमकी कशी असणार? याबाबत उत्सकता निर्माण झाली आहे. तसेच सौरभ दास आणि आशुतोष रांका यांच्या सुटकेनंतर कॉकरोच जनता पार्टीकडून आणखी एखाद्या नव्या आंदोलनाची घोषणा होणार का? हे पहाणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.
Now just waiting for my brothers to be free… https://t.co/EKzaJXppYd
— Abhijeet Dipke (@abhijeet_dipke) October 17, 2026
दिल्लीमध्ये मोठा गोंधळ
दरम्यान जंतर मंतर मैदानावर आंदोलन करण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे, तसेच या परिसरात पोलिसांनी जमावबंदी देखील लागू केली आहे. परंतु तरी देखील सौरभ दास आणि आशुतोष रांका हे दोघे आपल्या काही मित्रांसोबत जंतर मंतरवर गेले होते. त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. याचविरोधात शुक्रवारी अभिजीत दिपके यांनी आंदोलनाची हाक दिली होती. परंतु दिल्लीत आंदोलन सुरू होण्यापूर्वीच पोलिसांनी दिपके यांना ताब्यात घेतलं. त्यामुळे काही काळ या परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला होता. त्यांतर आता दिपके यांची जामीनावर सुटका करण्यात आली आहे.
