शैक्षणिक शुल्कमाफीसाठी ABVP आक्रमक, अब्दुल सत्तारांची गाडी रोखली, पोलिसांचा लाठीचार्ज

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क 30 टक्के माफ करावे, या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या गाडीसमोर 'रास्तो रोको' आंदोलन केलं (ABVP protest for 30 percent education fee waiver).

शैक्षणिक शुल्कमाफीसाठी ABVP आक्रमक, अब्दुल सत्तारांची गाडी रोखली, पोलिसांचा लाठीचार्ज

धुळे : विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क 30 टक्के माफ करावे, या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या गाडीसमोर ‘रास्ता रोको’ आंदोलन केलं. यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना आंदोलकांवर लाठीचार्ज करावा लागला (ABVP protest for 30 percent education fee waiver).

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांना विविध मागण्यांसाठी पालकमंत्री अब्दुल सत्तार यांची भेट घ्यायची होती. त्यासाठी त्यांनी पालकमंत्र्यांना भेटण्याचा अनेकवेळा प्रयत्नदेखील केला. मात्र, पालकमंत्र्यांसोबत भेट होऊ शकली नाही. त्यामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. अब्दुल सत्तार यांची गाडी आज (26 ऑगस्ट) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येताच विद्यार्थ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं.

आंदोलक विद्यार्थी पालकमंत्र्यांना आपल्या मागण्यांबाबतचे निवेदन देणार होते. मात्र, पालकमंत्र्यांच्या गाडीसमोर गोंधळ सुरु असल्याचे पाहिल्यानंतर पोलिसांनी आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज सुरु केला. याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ 12 ते 15 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे
(ABVP protest for 30 percent education fee waiver).

‘विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यात हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरलं आहे’, असा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. ‘उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आपल्या पदाचा राजीनाम्याची द्यावा’, अशी मागणी आंदोलक विद्यार्थ्यांकडून करण्यात आली आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *