AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ahmednagar : अहमदनगरमध्ये भीषण अपघात, 3 जण जागीच ठार तर 10 गंभीर जख्मी

कंटेनर, जीप आणि मोटारसायकल या तिहेरी वाहनांच्या धडकेत जीपमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर या अपघातात दहा जण गंभीर जख्मी झाले आहेत.

Ahmednagar : अहमदनगरमध्ये भीषण अपघात, 3 जण जागीच ठार तर 10 गंभीर जख्मी
| Edited By: दादासाहेब कारंडे | Updated on: Dec 16, 2021 | 10:55 PM
Share

अहमदनगर : नगरमधील राहुरी तालुक्यातील गुहा फाट्याजवळ एक भीषण अपघात झाला. नगर – मनमाड महामार्गावर हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात कंटेनर, जीप आणि मोटारसायकल यांची जोराची धडक झाली आहे. त्यात काहीजण मृत्यू पावले आहेत तर काही जण गंभीर जखमी झाले आहेत. गेल्या काही दिवसात या महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. महामार्गाचे काम पूर्ण होण्यास अजून किती काळ लागेल? हेही निश्चित नाही.

अपघातात 3 जण जागीच ठार

कंटेनर, जीप आणि मोटारसायकल या तिहेरी वाहनांच्या धडकेत जीपमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर या अपघातात दहा जण गंभीर जख्मी झाले आहेत. दहापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याचीही माहिती समोर आली आहे. जख्मींना उपाचारासाठी प्रवरा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

महामार्गाचे काम सुरू असल्याने एकेरी वाहतूक सुरू

या मार्गावर सध्या काम सुरू आहे. त्यामुळे एक मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तर महामार्गाचे काम सुरू असल्याने एकाच मार्गावरून वाहतूक सुरू होती. या अपघातानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली, त्यानंतर त्यांनी स्थानिकांच्या मदतीने अपघातग्रस्तांचं बचावकार्य सुरू केले, अपघातात जखमी झालेल्यांना त्यांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर या महामार्गावरील वाहतुक सुरळीत करण्यासाठी बराच काळ प्रय्तन सुरू होते. मात्र हे वाढते अपघात थांबवण्याचे आव्हान प्रशासनासमोर असणार आहे. या महामार्गावर आधीही अनेक अपघाताच्या घटना घडल्या आहेत. काही वेळेस वाहनचालकांचा वेगही अपघाताला कारणीभूत ठरतोय.

अँड्रॉयड युजर्सना WhatsApp मध्ये कॅमेरा इंटरफेस मिळणार, ग्रुप अ‍ॅडमिनसाठी नवीन फीचर्स

रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट हरवलंय? जाणून घ्या डुप्लिकेट RC बनवण्याची ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धत

Omicron : ‘ओमिक्रॉन’ संसर्गजन्यतेवर जागतिक आरोग्य संघटनेचे भाष्य; वाचा- नेमके काय म्हणाले?

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा