रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट हरवलंय? जाणून घ्या डुप्लिकेट RC बनवण्याची ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धत

काहीवेळा वाहनाचे रजिस्ट्रेशन डॉक्यूमेंट (नोंदणी दस्तऐवज) गहाळ होतात ज्यामुळे तुमचा त्रास वाढू शकतो. कारण वाहनाची सर्व कागदपत्रे देखील आरसीशी जोडलेली असतात.

रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट हरवलंय? जाणून घ्या डुप्लिकेट RC बनवण्याची ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धत
Cars (प्रातिनिधिक फोटो)
Follow us
| Updated on: Dec 16, 2021 | 10:03 PM

मुंबई : काहीवेळा वाहनाचे रजिस्ट्रेशन डॉक्यूमेंट (नोंदणी दस्तऐवज) गहाळ होतात ज्यामुळे तुमचा त्रास वाढू शकतो. कारण वाहनाची सर्व कागदपत्रे देखील आरसीशी जोडलेली असतात. समजा यादरम्यान तुमचे वाहन चोरीला गेले तर तुम्हाला वाहनाचा विमा वसूल करण्यासाठी वाहन चोरीचा एफआयआर नोंदवावा लागेल. त्यासाठी वाहन खरेदीचा पुरावा असणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला वाहन नोंदणी केलेल्या आरटीओ कार्यालयात जावे लागेल. (Did you Lost Registration Certificate? Know how to get duplicate RC online and offline)

जर तुम्हाला डुप्लिकेट आरसीसाठी नोंदणी करायची असेल, तर त्यासाठी तुम्हाला नमूद केलेला प्रोटोकॉल फॉलो करावा लागेल. तुम्ही डुप्लिकेट आरसीसाठी अर्ज करण्यापूर्वी, तुम्हाला त्याच आरसीची डुप्लिकेट प्रत का आवश्यक आहे हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. म्हणजेच तुम्हाला डुप्लिकेट आरसी कधी किंवा का हवी आहे? हेदेखील कळेल

डुप्लिकेट आरसीसाठी अर्ज करण्याचा ऑनलाइन मार्ग

  • तुमचा ब्राउझर ओपन करा आणि अधिकृत वेबसाइटवर नेव्हिगेट करा.
  • तिथे दिलेला फॉर्म भरा
  • पोलीस एफआयआर आणि वाहन विमा यांसारखे डिटेल्स एंटर करा.
  • शुल्क भरा. वाहनाच्या प्रकारानुसार शुल्क निश्चित केले जाते. उदाहरणार्थ, कार, जीप, टॅक्सी या हलक्या वाहनांसाठी 700 रुपये शुल्क आहे.
  • पेमेंट केल्यानंतर मिळालेली पावती सेव्ह करुन ठेवा आणि कॉपी करा.
  • पावती आणि इतर कागदपत्रे आरटीओ कार्यालयात द्या.
  • ऑनलाइन डुप्लिकेट आरसीसाठी आवश्यक कागदपत्रे
  • ऑनलाइन अर्जासोबत तुम्हाला आवश्यक कागदपत्रे त्या आरटीओ कार्यालयात पाठवावी लागतील. ही कागदपत्रे काही राज्यांमध्ये आवश्यक असू शकतात.
  • 26 नंबरचा फॉर्म भरा.
  • कार चोरीला गेल्यास किंवा हरवल्यास एफआयआरची मूळ प्रत जमा करा.
  • PUC ची व्हेरीफाईड प्रत
  • वैध विमा प्रमाणपत्राची व्हेरीफाईड प्रत (वॅलिड इंश्योरन्स सर्टिफिकेटची व्हेरीफाईड कॉपी)
  • अॅड्रेस व्हेरीफिकेशन
  • वाहतूक पोलिस चलन क्लिअरन्स.
  • पॅन कार्ड किंवा फॉर्म 60 आणि 61 ची व्हेरीफाईड प्रत.
  • चेसिस आणि इंजिनची पेन्सिल प्रिंट.
  • मालकाच्या स्वाक्षरीची ओळख.
  • रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट हरवलं आहे आणि ते परत मिळालं नाही असे प्रतिज्ञापत्र.

डुप्लिकेट आरसी ऑफलाइन कसे मिळवता येईल?

  • सर्व प्रथम, स्थानिक पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवा. त्यात वाहन मालक, चेसिस क्रमांक, इंजिन क्रमांक आणि नोंदणी क्रमांक समाविष्ट करा.
  • त्या आरटीओ कार्यालयात जा जिथे सर्वात आधी ऑटोमोबाईल रजिस्ट्रेशन करण्यात आले होते.
  • RC-Extract घ्या. RC-Extract मध्ये कार मालकाच्या नोंदणीकृत वाहनाची तसेच चालकाच्या परवान्याची माहिती असते.
  • डुप्लिकेट आरसी अर्ज फॉर्म पूर्ण करा.
  • डुप्लिकेट आरसी फॉर्म हा फॉर्म 26 शी जुळवा.
  • कार कर्जावर घेतल्याचे तुमच्या वाहन वित्त खात्याकडून (व्हेईकल फायनान्स) पुष्टी मिळवा.
  • तुम्हाला दुचाकी हवी आहे की चारचाकी हवी आहे ते ठरवा.
  • आरटीओ कार्यालयात कागदपत्रे जमा करा आणि पावती गोळा करा.

इतर बातम्या

नवीन वर्षात Toyota च्या गाड्या महागणार, Fortuner आणि Innova Crysta चा समावेश

Tesla च्या भारतात 7 ईव्ही लाँच होणार, केंद्र सरकारची मंजुरी, जाणून घ्या लाँचिंग कधी

13 लाखांची Mahindra Scorpio अवघ्या 3.8 लाखात खरेदीची संधी, जाणून घ्या कुठे मिळतेय ऑफर

(Did you Lost Registration Certificate? Know how to get duplicate RC online and offline)

Non Stop LIVE Update
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?.
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत.
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य.
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली.
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?.
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ.
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट.
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले....