AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वाल्मिक कराडला मकोका… सुरेश धस यांची पहिली प्रतिक्रिया, थेट म्हणाले, फर्दर डेव्हल्पमेंट…

मोठी बातमी समोर येत आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आरोप करण्यात आलेल्या वाल्मिक कराडवर अखेर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. यावर आता सुरेश धस यांनी पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

वाल्मिक कराडला मकोका... सुरेश धस यांची पहिली प्रतिक्रिया, थेट म्हणाले, फर्दर डेव्हल्पमेंट...
| Updated on: Jan 14, 2025 | 4:16 PM
Share

मोठी बातमी समोर येत आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आरोप करण्यात आलेल्या वाल्मिक कराडवर अखेर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.  वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आल्यानंतर आता परळीमधील वातावरण चांगलंच तापलं आहे. वाल्मिक कराडचे समर्थक रस्त्यावर उतरले असून, परळी बंदची हाक देण्यात आली आहे. परळीमध्ये सर्वत्र शुकशुकाट दिसून येत आहे. दरम्यान वाल्मिक कराड याला मोक्का लागल्यानंतर भाजप आमदार सुरेश धस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

नेमकं काय म्हणाले सुरेश धस? 

एसआयटीने जे काही काम केलं आहे, त्यानुसार फर्दर डेव्हल्पमेंट नुसार कोर्ट ऑर्डर देत आहे. त्यामुळे कुणी मागणी केली याचा विषय नाही. राज्य सरकारने नेमलेल्या एसआयटीने काम केलं आहे . कोणत्या गुन्ह्यात लावला काही माहीत नाही. कुणाला सोडणार नाही. कायद्याच्या कचाट्यात जे सापडतील त्यांना शिक्षा होईल.

पोलीस यंत्रणा आहे. आम्ही बोलून काही होत नाही. एसआयटी प्रभावीपणे काम करत आहे. त्यांनी नियमाप्रमाणे जी कडी जोडली असेल त्यात जे सापडतील त्यांना शिक्षा होईल. तिथे काय घडलं मला माहीत नाही. एसआयटीने कोर्टासमोर अर्ज केलाय एवढंच मला माहीत आहे. पण कायद्यापेक्षा कोणी मोठा नसतो हे मात्र निश्चित. आता एसआयटीनं कारवाई केली आहे. परत परत त्यावर बोलण्याची गरज नाही, असं सुरेश धस यांनी म्हटलं आहे.

परळी बंद 

परळीमध्ये आज सकाळपासूनच वाल्मिक कराड समर्थक रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळत आहे. परळीमध्ये जोरदार आंदोलन सुरू होतं. याच आंदोलनादरम्यान वाल्मिक कराड यांच्या आईची तब्येत देखील खालावली. दरम्यान त्यानंतर वाल्मिक कराडवर आता मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. वाल्मिक कराडवर मकोका लावताच परळीमधील वातावरण चांगलंच तापलं आहे. परळी बंदची हाक देण्यात आली असून, वाल्मिक कराडचे समर्थक रस्त्यावर उतरले आहेत. परळीत जोरदार आंदोलन सुरू आहे.  समर्थक आक्रमक झाले आहेत.

Follow Us
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील...
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील गरबा उत्सवात रंगत!
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका...
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका बदलली? आता भारतात...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल महोत्सवाने किल्ला उजळला
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल