AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुझ्या वागण्याचा प्रचंड.. विद्यानंद बापट यांच्या डीजेच्या भूमिकेवर अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिचे मोठे भाष्य..

विद्यानंद बापट यांनी पुण्यातील डीजेला जोरदार विरोध केला. ज्यानंतर त्यांच्यावर थेट हल्ला झाला. मात्र, पुण्यातील विद्यानंद बापट यांनी मांडलेला डीजेचा मुद्दा योग्यच असल्याचे अनेकांनी म्हटले. त्यातच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी मोठे विधान केले.

तुझ्या वागण्याचा प्रचंड.. विद्यानंद बापट यांच्या डीजेच्या भूमिकेवर अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिचे मोठे भाष्य..
Sonali Kulkarni and Vidyanand Bapat
| Updated on: Sep 06, 2026 | 7:56 AM
Share

डीजे आणि लाऊडस्पीकरवरील गोंगाटाविरोधात पुण्यातील विद्यानंद बापट या सामान्य नागरिकांच्या बोलक्या लढ्याला आता पुणेकरांचे बळ मिळताना दिसत आहे. मात्र, डीजेचा विरोध केल्याने त्यांच्यावर भर कॅमेऱ्यासमोर हल्लाही झाला. विद्यानंद बापट यांना झालेल्या मारहाणीविरोधात राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून प्रतिक्रिया उमटल्या. अनेकांनी निषेध केला. पण सामाजिक भान असलेल्या पुणेकरांनी कृतीतून त्यांच्या विचारांना पाठिंबा देण्याचे ठरवले आहे. पुण्यात गणेश उत्साहात डीजे वाजणार की नाही यावर अजूनही संभ्रम आहे. त्यातच मुख्यमंत्र्यांनी यावर प्रतिक्रिया दिली. विद्यानंद बापट यांचे अनेकांकडून समर्थन केले जात आहे. पोलिसांनी याप्रकरणात विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला करणाऱ्याला ताब्यात घेतले. मात्र, यादरम्यानचा व्हिडीओ व्हायरल होत असल्याने खळबळ उडाली.

त्यातच आता अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने देखील विद्यानंद बापट यांच्याबद्दल पोस्ट शेअर केली. सोनाली कुलकर्णीकडूनही विद्यानंद बापट यांचे समर्थन करण्यात आले. सोनाक्षी कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिले की, प्रिय विद्यानंद बापट… मनापासून आभार आणि शाबासकी.. जागरूक नागरिक असण्याची व्याख्या नव्याने मांडत आहेस..

विचार अत्यंत स्पष्ट.. संयम आणि मुद्देसूद भाषा, ठामपणा… तुझ्या ह्या वाहण्याचा प्रचंड अभिमान वाटतो.. तुझी दमछाक होऊ नये, याकरिता काळजी वाटते. सगळीच शहरे खडबडून जागी झाली आहेत. तुझ्यासारख्या नागरी नेतृत्वाची खूप जास्त गरज आहे. यासोबतच सोनाली कुलकर्णीने विद्यानंद बापट यांचा एक फोटोही शेअर केला. तुम्हाला बळ मिळो, असेही सोनाली कुलकर्णी हिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले.

अनेकजण विद्यानंद बापट यांचे समर्थन करत आहेत. त्यातच आता सोनाली कुलकर्णी यांच्याकडून समर्थन करण्यात आले. विद्यानंद बापट यांच्या मराठीने अनेकांना भुरळ पडली. स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही याबाबत बोलताना दिसले. फडणवीसांनी बापट यांच्या मराठीचे कौतुक केले आहे. फडणवीस म्हणाले होते की, ते जशी सुंदर भाषा वापरतात, तशीच त्यांनी आपले विचार मांडताना इतरांना त्रास होणार नाही अशा अकोमोडेटिव्ह पद्धतीने मांडणी करावी. मलाही त्यांच्याकडे ट्यूशन घ्यावी लागणार असल्याचे त्यांनी म्हटले.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...