AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut: सदावर्तेंना भाजपचं पाठबळ, राष्ट्रवादीतून भाजपात आलेल्यांकडूनच हल्ल्याचं समर्थन; राऊतांचा हल्लाबोल

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यावरून शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी भाजपवर (bjp) जोरदार हल्लाबोल केला.

Sanjay Raut: सदावर्तेंना भाजपचं पाठबळ, राष्ट्रवादीतून भाजपात आलेल्यांकडूनच हल्ल्याचं समर्थन; राऊतांचा हल्लाबोल
सदावर्तेंना भाजपचं पाठबळ, राष्ट्रवादीतून भाजपात आलेल्यांकडूनच हल्ल्याचं समर्थन; राऊतांचा हल्लाबोलImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 09, 2022 | 11:27 AM
Share

मुंबई: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यावरून शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी भाजपवर (bjp) जोरदार हल्लाबोल केला. काल पवारांच्या घरासमोर घडलेला प्रसंग हा आंदोलन नव्हता. हा हल्ला होता. त्या हल्ल्याचं समर्थन विरोधी पक्षातील लोक करत होते. विशेष म्हणजे राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले नेते त्याचं समर्थन करत होते, असं सांगतानाच अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना भाजपचं पाठबळ होतं. तो कुणाच्या घरात राहतो, कुणाकडून त्याला आर्थिक पाठबळ दिलं जातं हे समोर येत आहे. कालचा हल्ला हा त्यातलाच एक भाग होता, असा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला. राऊत यांनी आज शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी पवारांशी अर्धा तास चर्चा केली. त्यानंतर मीडियाशी संवाद साधताना राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला.

कालचा जो प्रसंग होता, त्या प्रसंगामागे जे कारस्थान होते ते आंदोलन नव्हतं. तो हल्ला होता. आंदोलन आम्हीही करतो. पण कालचं आंदोलन नसून हल्ला होता. त्या हल्ल्याचं समर्थन महाराष्ट्रातील विरोधी पक्षातील लोक करत आहेत. हा दळभद्रीपणाचा कळस आहे. अशा प्रकारे तुम्हाला सरकारला अडचणीत आणता येणार नाही. तुमची बेअब्रु होते. पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यांच्या घरावर हल्ला करणं चुकीचं आहे. त्यांचं महाराष्ट्र देशातील राजकारणात प्रचंड योगदान आहे. महाराष्ट्रात आपल्या लोकांना हल्ला करायला लावता हे पाप कुठे फेडाल हा प्रश्न आहे, असं सदावर्ते म्हणाले.

गरळ ओकण्यासाठी अर्थ पुरवठा

आता सुद्धा हा जो कोणी भाजपचा एक नवनिर्माण केलेला नेता आहे सदावर्ते. त्याला संपूर्ण पाठबळ भाजपचं आहे. तो कुठे राहतो? कुणाच्या घरात राहतो? त्याला आर्थिक पाठबळ कुणाचं आहे? त्याला महाविकास आघाडी, शरद पवार यांच्या विरोधात गरळ ओकण्यासाठी अर्थपुरवठा केला जातो. कालचा हल्ला त्यातलाच एक भाग होता. हे आम्ही जो तपास करत आहोत त्यातून सिद्ध झालं आहे, असा दावा त्यांनी केला.

तुम्ही मूळचे भाजपवाले आहात का?

ज्या प्रकारची भाजपच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया पाहिल्या हे बोलणारे कोण होते? जे कालपर्यंत राष्ट्रवादीत होते ते आज भाजपमध्ये गेले. ते पवारांविरोधात बोलत होते. या कालच्या हल्ल्याचं समर्थन करत होते, हा हलकटपणा आहे. ज्या पक्षाने तुम्हाला मोठं केलं, पवारांनी मोठं केलं, तुम्ही काय मूळचे भाजपवाले आहात का? नाही ना. पण बाडगा मोठ्याने बांग देतो. त्याचं सिलिंडरवर करून बांग देतो असं बाळासाहेब ठाकरे म्हणायचे, त्यातलाच हा प्रकार आहे, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.

संबंधित बातम्या:

Ajit Pawar On St: त्याला काहीच अर्थ नाही, भाजप नेत्यांच्या प्रतिक्रिया अजित पवारांनी उडवून लावल्या

Fadnavis on Pawar: हे भयावह आहे, आधी अजित पवार आणि आता फडणवीस, पोलिसांच्या अपयशावर मोठं प्रश्नचिन्ह, वळसे पाटलांची अडचण वाढतेय?

Sanjay Raut : अँटीसिपेटरी बेल के लिए तो चोर डकैत जाते है, नॉट रिचेबल असलेल्या सोमय्या पिता पुत्रांवर राऊतांची पुन्हा टीका

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.