मेटे आल्याने मुंडे भगिनी रथातून उतरल्या, पंकजांची समजूत काढण्यासाठी मुख्यमंत्री रेस्ट हाऊसवर!

मुख्यमंत्र्यांनी आपल्या रथात विनायक मेटेंना घेतल्याने मुंडे भगिनी नाराज होत्या. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना स्वत: यामध्ये हस्तक्षेप करावा लागला.  

मेटे आल्याने मुंडे भगिनी रथातून उतरल्या, पंकजांची समजूत काढण्यासाठी मुख्यमंत्री रेस्ट हाऊसवर!

बीड : भाजपची महाजनादेश यात्रा (BJP Mahajanadesh Yatra) बीडमध्ये दाखल झाल्यानंतर मोठ्या घडामोडी घडल्या. मुख्यमंत्र्यांनी महाजनादेश यात्रेत (BJP Mahajanadesh Yatra) विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. मुख्यमंत्र्यांनी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनजय मुंडेवर जोरदार टीका केली. आगामी निवडणुकांमध्ये विरोधकांना विरोधी पक्षनेता मिळणार नाही असे मुख्यमंत्री म्हणाले.

या सर्व भाषणाबाजीपूर्वी नाट्यमय घडामोडी घडल्या. महाजनादेश यात्रा काल बीडमध्ये आली.  सायंकाळच्या सुमारास बीडची सभा होती. त्यादरम्यान शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे यांनी बीडच्या प्रवेशद्वारा जवळच यात्रेचे भव्य स्वागत केलं.  विनायक मेटे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रथावर आले.  मात्र आधीच रथावर असलेल्या पंकजा आणि प्रितम या मुंडे भगिनींनी रथातून काढता पाय घेतला.  विनायक मेटे आणि  पंकजा मुंडे यांच्यात लोकसभा निवडणुकीदरम्यान मोठी दरी निर्माण झाली आहे. त्यांच्यातील धुसफूस कालही पाहायला मिळाली.

विनायक मेटे आल्यानंतर मुंडे भगिनींनी रथातून काढता पाय घेतला. पंकजा मुंडे आणि प्रितम मुंडे यांच्यासह त्यांचे कार्यकर्ते कार्यक्रमस्थळी न जाता थेट बीड येथील रेस्ट हाऊसला आले. त्यानंतर पंकजा मुंडे यांची समज काढण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रेस्ट हाऊसवर जावं लागलं. मुख्यमंत्री स्वत: पंकजा मुंडे यांना सभास्थळी आपल्यासोबत घेऊन आल्याचं सांगण्यात येत आहे.

मुख्यमंत्र्यांनी आपल्या रथात विनायक मेटेंना घेतल्याने मुंडे भगिनी नाराज होत्या. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना स्वत: यामध्ये हस्तक्षेप करावा लागला.

विनायक मेटेंचं स्पष्टीकरण

दरम्यान, सभेला उशीर होत असल्यामुळे पालकमंत्री पंकजा मुंडे आमच्या कार्यक्रमातून निघून गेल्या, अशी सारवासारव विनायक मेटे यांनी केली.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *