Ahilyanagar District Central Cooperative Bank Ltd election Result : अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणुकीत प्रतिष्ठेच्या लढाईत निलेश लंकेंची विखे पाटलांवर मात

Ahilyanagar District Central Cooperative Bank Ltd election Result : पारनेरमध्ये निलेश लंके विरुद्ध विखे समर्थक राहुल शिंदे यांच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष होतं. जिल्हा बँकेच्या सत्तेसोबतच राजकीय प्रतिष्ठेचीही लढाई आहे.

Ahilyanagar  District Central Cooperative Bank Ltd election Result : अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणुकीत प्रतिष्ठेच्या लढाईत निलेश लंकेंची विखे पाटलांवर मात
Nilesh Lanke vs radhakrishna vikhe patil
| Updated on: Nov 03, 2026 | 10:18 AM

कुणाल जायकर, प्रतिनिधी : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीची मतमोजणी सुरु झाली आहे. एकूण दहा जागा आहेत. 99.27 टक्के मतदान झालं होतं. पारनेर सेवा सहकारी संस्था मतदार संघातून खासदार निलेश लंके विजयी झाले आहेत. लंके यांना 104 पैकी 63 मतं मिळाली. 21 पैकी 11 जागा यापूर्वीच बिनविरोध आल्या आहेत. एकूण तीन हजार 837 मतदार आहेत. विखे-थोरात यांच्या सहकार पॅनलविरोधात निलेश लंके यांच्या परिवर्तन पॅनलचा सामना आहे. पारनेरमध्ये निलेश लंके विरुद्ध विखे समर्थक राहुल शिंदे यांच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष होतं. जिल्हा बँकेच्या सत्तेसोबतच राजकीय प्रतिष्ठेचीही लढाई आहे. यात निलेश लंके यांनी बाजी मारली आहे.

अहिल्यानगर जिल्हा बँक मतमोजणी सुरु आहे. एकूण 14 टेबलवर मतदारसंघ निहाय मतमोजणी होणार आहे. विविध कार्यकारी सोसायटीसाठी 4 जागा, शेतीपूरक 1 जागा, महिला राखीव 2 जागा, अनु जाती जमाती 1, इतर मागास वर्ग एक, भटक्या विमुक्त जाती एक या सहा मतदारसंघाची मतमोजणी सुरु होणार आहे. एकूण तीन फेऱ्या होतील. पहिल्या फेरीत विविध कार्यकारी सोसायटी, दुसऱ्या फेरीत शेती पूरक मतदारसंघ आणि तिसरी फेरी महिला राखीव,अनु जाती जमाती, इतर मागासवर्ग,भटक्या विमुक्त जाती उमेदवार मतमोजणी होईल.

Loading...

दिग्गजांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागलीय

अहिल्यानगर, सातारा आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक मंडळाची निवडणूक होत आहे. या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे. जिल्ह्याच्या राजकारणात राजकीय वर्चस्वाच्या दृष्टीने या निवडणुका महत्वाच्या आहेत. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक मंडळ निवडणुकीत पाटण विकास सेवा सोसायटी मतदारसंघातून पालकमंत्री शंभूराज देसाई विजयी झाले आहेत. त्यांनी पारंपारिक प्रतिस्पर्धी भाजपचे सत्यजितसिंह पाटणकर यांचा पराभव केला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us