AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पोलीस मुख्यालयात फुटले ग्रेनाईड, दोघांची करंगळी तुटली, अहिल्यानगरमध्ये खळबळ

अहिल्यानगर पोलीस मुख्यालयात मॉक ड्रिलदरम्यान हँड ग्रेनेड फुटले. या दुर्घटनेत चार प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचारी जखमी झाले, त्यापैकी दोघांची करंगळी तुटली. योग्य सूचनांच्या अभावामुळे हा अपघात झाल्याचे समोर आले आहे, ज्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलीस मुख्यालयात फुटले ग्रेनाईड, दोघांची करंगळी तुटली, अहिल्यानगरमध्ये खळबळ
ग्रेनाईड फुटल्याने पोलीस कर्मचारी जखमी
| Updated on: May 25, 2026 | 12:14 PM
Share

राज्यात अनेक ठिकाणी मॉक ड्रिल घेण्यात येत आहे. अचानक उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीला हाताळण्यासाठी मॉक ड्रिल घेण्यात येतात. नागरिकांनी स्वत:चा बचाव कसा करायचा? पॅनिक सिच्युएशनमध्ये गोंधळून न जाता परिस्थिती कशी हाताळायची याचे प्रात्यक्षिकं करून दाखवले जातात. पोलीस आणि अग्निशमन दलाकडून ही प्रात्यक्षिके करून दाखवली जातात. अहिल्या नगर पोलीस मुख्यालयात ही प्रात्यक्षिके सुरू असतानाच हँड ग्रेनाईड फुटले. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

अहिल्यानगर पोलीस मुख्यालयात आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास मॉक ड्रिल घेण्यात आली होती. यावेळी प्रात्यक्षिकं सुरू असतानाच हँड ग्रेनेड फुटले. त्यामुळे एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेत चार पोलीस कर्मचारी जखमी झाले. शिवराज पवार, शुभम कावरे, गणेश मढे आणि योगेश सोळुंके हे चौघे प्रशिक्षणार्थी कर्मचारी जखमी झाले. या दुर्घटनेत दोन पोलीस कर्मचाऱ्यांची करंगळी तुटली आहे. तर दोन कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत.

नेमकं काय घडलं?

मॉक ड्रिल हाताळण्याचे प्रशिक्षण सुरू असताना हॅन्ड ग्रेनाईड हातात फुटल्याने चार कर्मचारी जखमी झाले. पोलीस मुख्यालयातच ही घटना घडली. पोलीस कर्मचारी हातात हँड ग्रेनाईड घेऊन माहिती देत होते. ही माहिती देत असतानाच अचानक हँड ग्रेनाईडचा स्फोट झाला. त्यामुळे एकच धावपळ उडाली. यात चारजण जखमी झाले. दोघे गंभीर जखमी झाल्याने त्यांना ताबडतोब उपचारासाठी खाजगी रुग्णालय दाखल करण्यात आले आहे. चौघांचीही प्रकृती ठिक असल्याचं सांगितलं जात आहे. पण दोघांची करंगळी तुटून पडली आहे.

करंगळीच तुटली

आमचा मॉक ड्रिलचा डेमो सुरू होता. आमच्या हातात ग्रेनाईड होते. ते कसे फोडायचे? काय करायचे? हे काहीच आम्हाला सांगितलं नव्हतं. ऑर्डर आल्यावर पिन ओढली आणि जागेवर हातात ब्लास्ट झाला. माझी करंगळी तुटली. डोळ्यात धूर गेला, असं जखमी पोलीस कर्मचाऱ्याने सांगितलं.

दुसऱ्या एका जखमी कर्मचाऱ्यानेही याची माहिती दिली. आमच्याकडे ग्रेनाईड होते. आम्हाला त्याची माहिती आम्हाला नव्हती. सूचना होत्या. पण संपूर्ण सूचना दिल्या नव्हत्या. या स्फोटात माझी करंगळी तुटून पडली आहे, असं या जखमी पोलीस कर्मचाऱ्याने सांगितलं.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा