AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जुळ्या बाळांना जन्म देऊन कोरोनाबाधित मातेचं निधन, बाळांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने मोठा दिलासा

अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात कोरोनाबाधित मातेच्या पोटी जन्माला आलेल्या जुळ्या बाळांचा रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह आला आहे (Ahmednagar Corona Update).

जुळ्या बाळांना जन्म देऊन कोरोनाबाधित मातेचं निधन, बाळांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने मोठा दिलासा
अमानुष ! पश्चिम बंगालमध्ये तृतीयपंथियाचा कहर
| Updated on: May 30, 2020 | 1:46 PM
Share

अहमदनगर : अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात कोरोनाबाधित मातेच्या पोटी जन्माला आलेल्या जुळ्या बाळांचा रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह आला आहे (Ahmednagar Corona Update). या नवजात शिशुंचे स्त्राव काल (30 मे) तपासणीसाठी घेण्यात आले होते. या तपासणीत त्यांना कोरोनाची लागण झाली नसल्याचं समोर आलं आहे. या जुळ्या बाळांच्या आईचं काल (29 मे) पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास कोरोनामुळे  दु:खद निधन झालं. मात्र, बाळांचा रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे (Ahmednagar Corona Update).

मूळ मुंबईतील चेंबूरची असलेली महिला अहमदनगरमधील निंबळकला आली होती. त्रास होऊ लागल्याने तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर ती ‘कोरोना’ पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आला. तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते.

महिलेचे गुरुवारी (28 मे) सिझेरियन करण्यात आले. सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमरास तिने एक मुलगा आणि एक मुलगी अशा जुळ्या बाळांना जन्म दिला. दोन्ही बाळांचे वजन 2 किलो इतके भरले. त्यामुळे कुटुंबासह आरोग्य यंत्रणेत आनंदाची लकेर उमटली. मात्र शुक्रवारी पहाटे साडेतीन वाजता तिची प्राणज्योत मालवल्याची चटका लावणारी बातमी आली आणि सर्वच हळहळले. जिल्हा आरोग्य यंत्रणेने या वृत्ताला दुजोरा दिला.

हेही वाचा : नगरमध्ये कोरोनाबाधित गर्भवती महिलेचं सिझेरियन, डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे जुळ्यांना जीवनदान

अहमदरनगर शहरात आज एकाच कुटुंबातील 5 व्यक्तींना करोनाची लागण झाली आहे. यात 1 महिला आणि 4 पुरुषांचा समावेश आहे. याच कुटुंबातील एक महिला पुण्यात कोरोनाबाधित आढळली आहे. दुसरीकडे संगमनेर येथील एका खासगी प्रयोगशाळेत 2 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

संबंधित बातमी :

जुळ्या बाळांना जन्म देऊन सुखरुप ठेवलं, कोरोनाग्रस्त माऊलीने 24 तासात डोळे मिटले!

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.