नगरमध्ये कोरोनाबाधित गर्भवती महिलेचं सिझेरियन, डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे जुळ्यांना जीवनदान

अहमदनगरमध्ये कोरोनाबाधित महिलेने जुळ्यांना जन्म दिला आहे (Corona positive woman gives birth to twins).

नगरमध्ये कोरोनाबाधित गर्भवती महिलेचं सिझेरियन, डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे जुळ्यांना जीवनदान

अहमदनगर : अहमदनगरमध्ये कोरोनाबाधित महिलेने जुळ्यांना जन्म दिला आहे (Corona positive woman gives birth to twins). जिल्हा सामान्य रुग्णालयात या महिलेचं सिझरियन करण्यात आलं. या महिलेने एक मुलगा आणि एका मुलीला जन्म दिला आहे. दोन्ही बाळांची आणि मातेची तब्येत ठीक असल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिली आहे. दोन्ही बाळांचे वजन 2 किलो इतके भरले आहे.

मुंबईहून निंबलक येथे आलेल्या या महिलेचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. या महिलेने आज (28 मे) सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमरास जुळ्यांना जन्म दिला. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या टीमने तिचे सिझेरियन केले. सध्या या मातेची आणि तिच्या बाळांची तब्येत स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे (Corona positive woman gives birth to twins).

अहमदनगरमधील कोरोनाबाधितांची संख्या 103 वर पोहोचली आहे. यापैकी 58 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यात सध्या 31 रुग्णांवर उपचार सुरु आहे. दरम्यान, मुंबई-पुणेसह इतर रेड झोन परिसरातून आलेल्या नागरिकांमुळे अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढल्याचं समोर आलं आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन प्रचंड मेहनत घेत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 237 नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. यापैकी 2 हजार 36 नागरिकांचा अहवाल कोरोना निगेटिव्ह आला आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत 9 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

संबंधित बातम्या :

Kolhapur Corona | कोल्हापुरातील डोंगराळ आणि गवताळ शाहूवाडी तालुक्यात कोरोना कसा पोहोचला?

केवळ 450 रुपयात कोरोना टेस्ट, 5 मिनिटात रिपोर्ट, आव्हाडांच्या पुढाकाराने ठाण्यात चाचण्या

महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीत सुधारणा, मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचा दावा

सायन हॉस्पिटलच्या डॉक्टरांची कमाल, जीवाची बाजी लावून दीड महिन्याच्या कोरोनाबाधित बाळावर मेंदूची शस्त्रक्रिया

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *