AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नगरमध्ये काँग्रेस फुटली, 6 नगरसेवक भाजपात!

कुणाल जायकर, टीव्ही 9 मराठी, अहमदनगर: अहमदनगर महापालिकेची रणधुमाळी सुरु आहे.  इथे काँग्रेसला निवडणुकीपूर्वीच धक्का बसला आहे. कारण काँग्रेसचे एक दोन नव्हे तर तब्बल 6 विद्यमान नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या सहाही नगरसेवकांना भाजपने उमेदवारीही दिली. चक्क कोतकर परिवाराच्या कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.  त्यामुळे काँग्रेसच्या सुजय विखेंना हा धक्का आहे. त्यामुळे भाजप आमदार शिवाजी […]

नगरमध्ये काँग्रेस फुटली, 6 नगरसेवक भाजपात!
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Jul 05, 2019 | 5:00 PM
Share

कुणाल जायकर, टीव्ही 9 मराठी, अहमदनगर: अहमदनगर महापालिकेची रणधुमाळी सुरु आहे.  इथे काँग्रेसला निवडणुकीपूर्वीच धक्का बसला आहे. कारण काँग्रेसचे एक दोन नव्हे तर तब्बल 6 विद्यमान नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या सहाही नगरसेवकांना भाजपने उमेदवारीही दिली. चक्क कोतकर परिवाराच्या कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.  त्यामुळे काँग्रेसच्या सुजय विखेंना हा धक्का आहे.

त्यामुळे भाजप आमदार शिवाजी कर्डीले पुन्हा एकदा किंगमेकर ठरण्याची चिन्हं आहेत. भाजपने केवळ काँग्रेसच्याच नव्हे तर अन्य पक्षातून आलेल्या एकूण 13 जणांना उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे भाजपने खासदार दिलीप गांधी यांचा पुत्र आणि सुनेलाही उमेदवारी दिली. त्यामुळे भाजपने नगरमध्ये घराणेशाहीच जोपासली आहे.

महानगरपालिकेत सत्ता कोणाची?

अहमदनगर महापालिकेच्या 17 प्रभागातील 68 जागांसाठी 9 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. तर 10 डिसेंबरला मतमोजणी होईल. शहराची एकूण लोकसंख्या 3 लाख 46 हजार 755 तर एकूण मतदारांची संख्या 2 लाख 56 हजार 719 इतकी आहे. नगर पालिकेत 17 प्रभागात 68 वार्ड आहेत.

आतापर्यंत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांचे महापौर झाले आहेत. 2014 च्या विधानसभा निवडणुकीतला पराभव वगळता, शिवसेना नेहमी शहरात वरचढ राहिलेली आहे. तर भाजपादेखील एक हाती सत्ता काबीज करण्यासाठी मोठ्या ताकदीने रिंगणात उतरली आहे. त्यामुळे या निवडणुकीत शिवसेना, भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांमध्ये लढत पाहायला मिळत आहे. शिवाय त्यानंतर लगेच लोकसभा आणि विधानसभा निवडणुका आहेत. त्यामुळे कोण बाजी मारणार याकडे नगरकरांसह राज्याचं लक्ष लागलंय.

गेल्या पाच वर्षातील विविध घोटाळे, छिंदम प्रकरण, केडगाव हत्याकांड अशा वेगवेगळ्या प्रकरणांमुळे नगर राज्यभर गाजलं. पण आता महापालिका निवडणुकीच्या तोंडावर कोणता मुद्दा प्रचारासाठी वापरला जातो, त्याकडे लक्ष लागलं आहे.

महापालिकेतील सध्याचं पक्षीय बलाबल?

राष्ट्रवादी :-18

शिवसेना :-18

काँग्रेस :-11

भाजप :-9

मनसे :-4

अपक्ष:-9

एकूण :-68

गेल्या पाच वर्षातील गाजलेली प्रकरणं

बोल्हेगाव आणि सावेडी कचरा डेपो

40 लाखांचा पथदिवे घोटाळा

शहरातील उड्डाणपूल

कत्तलखान्यावरुन गदारोळ

भाजपचा उपमहापौर श्रीपाद छिंदम याचं शिवरायांबद्दलचं आक्षेपार्ह वक्तव्य

केडगाव पोटनिवडणुकीत दोन शिवसैनिकांची हत्या

पोलीस अधीक्षक कार्यालय तोडफोड प्रकरण

कर्डिले किंगमेकर?

अहमदनगर शहर कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतं. मात्र सध्या चर्चा आहे ती इथल्या सोयऱ्या-धायऱ्यांच्या राजकारणाची. नगरचे राजकारण हे तीन परिवांच्या अवती-भोवती फिरत असतं. कोतकर-जगताप आणि कर्डिले हे सर्वच वेगवेगळ्या पक्षात आहेत. मात्र प्रत्यक्षात मात्र सर्वच एकत्र.

भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांना तीन मुली आहेत. पहिली मुलगी कोतकरांच्या घरात, तर दुसरी जगतापांच्या घरात आणि तिसरी मुलगी शिवसेनेच्या गाडे परिवारात दिली आहे. त्यामुळे हे तीनही परिवार राजकारणात कोणत्याही पक्षाचे असले तरी राजकीय स्वार्थासाठी आतून एकत्रच असतात. यात नेहमीच किंगमेकरच्या भूमिकेत असतात ते आमदार शिवाजी कर्डिले.

कसं आहे सोयऱ्या-धायऱ्यांचं राजकारण?

कार्डिलेंचे मोठे जावई संदीप कोतकर काँग्रेसचे माजी महापौर, तर कर्डिलेंची मुलगी सुवर्णा कोतकर या देखील काँग्रेसच्या माजी उपमहापौर आणि सध्या नगरसेविका आहेत.

कार्डिलेंचे दुसरे जावई संग्राम जगताप हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत. तर कर्डिलेंची दुसरी मुलगी शीतल जगताप देखील नगरसेविका आहेत.

आता तिसऱ्या मुलीनेही राजकारणात प्रवेश केलाय. कर्डिले यांचे तिसरे जावई अमोल गाडे, आता त्याची पत्नी ज्योती गाडे या शिवसेनेच्या गाडे परिवारातील असून राष्ट्रवादीकडून निवडणूक लढणार आहेत. आता त्यामुळे पुन्हा सोयऱ्या-धायऱ्यांच्या राजकारणाची चर्चा रंगू लागली आहे.

संबंधित बातम्या 

अहमदनगर : तीन मुली तीन पक्षात, म्हणूनच कर्डिले किंगमेकर!

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली