अहमदनगर : आमदार-खासदार पुत्रांसह 400 जण तडीपार

कुणाल जायकर टीव्ही 9 मराठी, अहमदनगर : अहमदनगर महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर 400 जणांवर तडीपारीची कारवाई केली जाणार आहे. अहमदनगर येथील पोलीस अधीक्षक कार्यालय तोडफोड प्रकरण आणि केडगावच्या पोटनिवडणुकीत झालेल्या दोन शिवसैनिकांच्या हत्येनंतर दगडफेक प्रकरणी ही कारवाई करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, यात खासदार आणि आमदार पुत्रांचा समावेश असल्याने अहमदनगरच्या सर्वच राजकीय पक्षांचे धाबे दणाणले आहेत. अनेक …

अहमदनगर : आमदार-खासदार पुत्रांसह 400 जण तडीपार

कुणाल जायकर टीव्ही 9 मराठी, अहमदनगर अहमदनगर महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर 400 जणांवर तडीपारीची कारवाई केली जाणार आहे. अहमदनगर येथील पोलीस अधीक्षक कार्यालय तोडफोड प्रकरण आणि केडगावच्या पोटनिवडणुकीत झालेल्या दोन शिवसैनिकांच्या हत्येनंतर दगडफेक प्रकरणी ही कारवाई करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, यात खासदार आणि आमदार पुत्रांचा समावेश असल्याने अहमदनगरच्या सर्वच राजकीय पक्षांचे धाबे दणाणले आहेत.

अनेक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे ऐन महानगरपालिका निवडणुकीच्या काळात 400 जणांवर तडीपारीची कारवाई होणार आहे.

या निवडणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विशेष खबरदारी म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे. तसेच विविध गुन्हे दाखल असलेल्या 241 राजकीय कार्यकर्त्यांना तडीपारीच्या नोटीसा बजावल्या आहेत. त्यात खासदारपुत्र सुवेंद्र गांधी, माजी आमदारपुत्र विक्रम राठोड, यांच्यासह आजी-माजी नगरसेवकांचा समावेश आहे.

गणेशोत्सवात 500 जणांवर कारवाई

गणेशोत्सव काळात अशीच कारवाई करण्यात आली होती. निवडणुकीत इच्छुक उमेदवारांवरही तडीपारीची टांगती तलवार आहे. गणेशोत्सवाच्या काळात नगर शहरातील गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि गुन्हे दाखल असलेल्या 500 प्रमुख व्यक्तींवर तडीपारीची कारवाई केली गेली होती. त्यामध्ये मंडळाचे अध्यक्ष, कार्यकर्ते, नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी आदींचा समावेश होता.

इच्छुक उमेदवारांवर होणार कारवाई  

विशेष म्हणजे यातील बहुतेक कार्यकर्ते महापालिकेसाठी उमेदवारी अर्ज भरणार आहेत. संबंधित पक्षाने त्यांची उमेदवारी जाहीर केली आहे. अशा उमेदवारांना बाजू मांडण्याची संधी दिली जाईल. गुन्हेगारीची तीव्रता पाहून कोणावर कोणती कारवाई करायची, ते जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासन ठरवणार आहे. तरी २० तारखेपासून संबंधितांना जिल्हयाबाहेर जावे लागणार आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *