AIMA Election | नाशिकमध्ये उद्योजक निवडणुकीच्या रिंगणात; ‘आयमा’त एकता विरुद्ध उद्योग विकासमध्ये थेट लढत

| Updated on: Jan 17, 2022 | 11:22 AM

यंदा आयमाच्या निवडणुकीत सत्ताधारी एकदा पॅनलने नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. तर उद्योग विकास पॅनलने बहुजन चेहरा देणाऱ्या पॅनलची बांधणी केलीय.

AIMA Election | नाशिकमध्ये उद्योजक निवडणुकीच्या रिंगणात; आयमात एकता विरुद्ध उद्योग विकासमध्ये थेट लढत
AIMA Office, Nashik.
Follow us on

नाशिकः नाशिकमध्ये उद्योजकांच्या अंबड इंडस्ट्रीज अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या (आयमा) द्वैवार्षिक निवडणुकीत रंगत आलीय. उमदेवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशीपर्यंत 30 जागा 73 उमेदवार रिंगणात उतरलेत. सध्या आयमावर एकता पॅनलची सत्ताय. या पॅनलकडून 35 जणांनी अर्ज भरलेत, तर विरोधात उद्योग विकास पॅनललने उडी घेतलीय. या पॅनलकडून 38 जण रिंगणात उतरलेत.

दोन हजार उद्योजक

आयमा संघटेचे तब्बल 2 हजारांच्यावर उद्योजक सभासद आहेत. त्यामुळे या संघटनेची निवडणूक प्रतिष्ठेची समजली जाते. सध्या एकता पॅनलकडून अध्यक्षपदासाठी निखिल पाचांळ आणि जनरल सेक्रेटरी पदासाठी ललित बुब यांनी अर्ज भरलेत. तर उद्योग विकास पॅनलकडून अध्यक्षपदासाठी संजय महाजन आणि जनरल सेक्रेटरी पदासाठी एन. डी. ठाकरे रिंगणात आहेत. यंदा ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली आहे.

कोरोनाचे सावट

खरे तर कोरोनाच्या सावटामुळे आयमाची निवडणूक होती की नाही, याबद्दल चर्चा सुरू होत्या. दीड वर्षापूर्वी नाशिक इंडस्ट्रीज अॅण्ड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन अर्थात निमाची निवडणूक स्थगित करण्यात आली होती. त्यामुळे ही निवडणूक तरी होणार का, अशी चर्चा होती. या निवडणुकीत ब्राह्मण बिझनेस नेटवर्कचे संस्थापक श्रीपाद कुलकर्णी यांनीही उडी घेतलीय. त्यामुळे निवडणुकीत रंग भरेल, अशी चर्चा सुरूय.

प्रशासनाला धारेवर धरले

आयमा निवडणुकीच्या मतदार याद्यांमध्ये सभासदांचे मोबाईल क्रमांक नाहीयत. त्यामुळे या याद्यावर मोबाईल क्रमांक समाविष्ट करून द्यावे, अशी तक्रार श्यामराव जाधव यांनी केली आहे. उद्योग विकास पॅनलनेही अशीच मागणी निवडणूक अधिकाऱ्यांकडे केलीय. यापूर्वी झालेल्या निवडणुकीमध्येही उद्योजकांनी प्रशासनाच्या विविध तांत्रिक बाजूवर बोट ठेवत त्यांना धारेवर धरले होते. तेच आताही पाहायला मिळते आहे.

नवे विरुद्ध जुने

यंदा आयमाच्या निवडणुकीत सत्ताधारी एकदा पॅनलने नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. सोबतच मावळते अध्यक्ष वरुण तलवार, ज्येष्ठ उद्योजक राधाकृष्ण नाईकवाडे यांनीही रिंगणात उडी घेतलीय. तर उद्योग विकास पॅनलने बहुजन चेहरा देणाऱ्या पॅनलची बांधणी केलीय. पॅनलेचे नेते आणि निमा संघटनेचे माजी अध्यक्ष शशिकांत जाधव, तुषार चव्हाण, कैलास आहेर हे नेतृत्व करत आहेत. त्यातच ब्राह्मण बिझनेस नेटवर्कचे संस्थापक श्रीपाद कुलकर्णी यांनीही निवडणुकीत उडी घेतलीय. त्यामुळे येणाऱ्या काळात ही रंगत वाढत जाणार आहे.

इतर बातम्याः

महाराष्ट्र पक्षीमित्र संघटेला 40 वर्षे पूर्ण; आजवर 64 संमेलनांचे आयोजन, पर्यावरण चळवळीच्या अनोख्या कार्याला उजाळा…!

Nashik Jobs : घरबसल्या नोकरी मिळवा; नाशिकमध्ये ऑनलाईन रोजगार मेळावा, कसे व्हाल सहभागी?

Nashik Corona : नाशिक जिल्ह्यात 16 कोविड सेंटर सुरू; कुठे मिळतायत उपचार?