AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महामार्गांवर ‘हवाई रुग्णवाहिका’ सेवा, ‘गोल्डन अवर’मध्ये मिळणार तातडीचे उपचार

या बैठकीला आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, गृहराज्यमंत्री योगेश कदम, परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, आरोग्य विभागाचे संचालक संजय काटकर वाहतूक पोलीस विभागाचे अधीक्षक डॉ. सुनील भारद्वाज यांच्यासह मोटार परिवहन विभाग, आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

महामार्गांवर ‘हवाई रुग्णवाहिका’ सेवा, ‘गोल्डन अवर’मध्ये मिळणार तातडीचे उपचार
Air Ambulance' service on highways
| Updated on: Oct 13, 2026 | 5:15 PM
Share

आपल्या देशाइतकेच रस्ते अपघात जपानसारख्या राष्ट्रातही होत असतात, परंतू तेथील अपघाती मृत्यूंची संख्या आपल्यापेक्षा खूपच कमी असते. याला कारण अपघातानंतर पहिल्या तासात मिळणारी वैद्यकीय मदत. त्यामुळे रस्ते अपघातात आता हेलिकॉप्टरने जखमींना तातडीची मदत देण्यासाठी एअर एम्ब्युलन्स ही संकल्पना राज्यात राबविली जाणार आहे. काय असणार आहे नेमकी योजना वाचा…

राज्यातील महामार्गांवर होणाऱ्या गंभीर रस्ते अपघातांतील जखमींना वेळेत वैद्यकीय उपचार मिळावेत आणि त्यांचे प्राण वाचविण्यास मदत व्हावी, या उद्देशाने ‘हवाई रुग्णवाहिका’ सेवा सुरू करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. अपघातानंतरचा पहिला तास, म्हणजेच ‘गोल्डन अवर’, हा जखमींच्या उपचारांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असतो. या निर्णायक काळात जखमींना तातडीने ट्रॉमा केअर सेंटरपर्यंत पोहोचविण्यासाठी हवाई रुग्णवाहिका सेवा प्रभावी ठरू शकते, अशी भूमिका परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मांडली आहे.

वेळापत्रक निश्चित

या प्रकल्पासाठी १५ नोव्हेंबरपर्यंत प्रमाणित कार्यपद्धती (SOP) तयार करून तिला मंजुरी घेण्याचे नियोजन आहे. त्यानंतर नोव्हेंबरअखेर उच्चाधिकार समितीची मंजुरी घेऊन निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या प्रक्रियेनंतर नवीन वर्षाच्या सुरुवातीला हवाई रुग्णवाहिका सेवा सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

राज्यात दरवर्षी सुमारे १५ हजार रस्ते अपघात होत असल्याची माहिती आहे. यापैकी अनेक अपघातांमध्ये जखमींना वेळेत उपचार मिळणे हे मोठे आव्हान ठरते. विशेषतः महामार्गांवरील गंभीर अपघात, वाहतूक कोंडी, रुग्णालयापर्यंतचे अंतर आणि आपत्कालीन वैद्यकीय सुविधांची उपलब्धता या बाबी लक्षात घेता, अपघातग्रस्तांना तातडीने उपचार मिळण्यासाठी अधिक सक्षम यंत्रणा उभारण्याची आवश्यकता आहे.

समृद्धी, मुंबई-पुणे आणि मुंबई-गोवा महामार्गांना प्राधान्य

समृद्धी महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि मुंबई-गोवा महामार्ग या महत्त्वाच्या मार्गांवर अपघातग्रस्तांना जलद वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी विशेष यंत्रणा उभारण्याचे नियोजन आहे. या यंत्रणेअंतर्गत हवाई रुग्णवाहिका सेवेची उपलब्धता, जखमींना सुरक्षितपणे ट्रॉमा केअर सेंटरपर्यंत पोहोचविण्याची कार्यपद्धती आणि विविध आपत्कालीन यंत्रणांमधील समन्वय यांवर विशेष भर देण्यात येणार आहे.

परिवहन, आरोग्य आणि पोलीस विभागांचा समन्वय

हवाई रुग्णवाहिका सेवेसह अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळण्यासाठी परिवहन विभाग, आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रमाणित कार्यपद्धती निश्चित करण्यात येणार आहे. यासाठी ट्रॉमा केअर सेंटरचे जाळे निश्चित करणे, सेवा पुरवठादारांचे पॅनेल तयार करणे, रस्ता सुरक्षा निधीतून आवश्यक आर्थिक तरतूद करणे आणि आपत्कालीन प्रतिसादासाठी प्रमाणित कार्यपद्धती विकसित करणे, अशा उपाययोजनांवर भर दिला जाणार आहे.

अपघातातील प्रत्येक जीव अनमोल!

रस्ते अपघात रोखणे ही शासनाची प्राथमिक जबाबदारी आहेच; मात्र अपघात घडल्यानंतर जखमींना वेळेत उपचार मिळणेही तितकेच महत्त्वाचे आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि वेगवान आपत्कालीन वैद्यकीय सेवांच्या मदतीने रस्ते अपघातांतील मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.

हवाई रुग्णवाहिका सेवा सुरू करण्याच्या नियोजनामुळे महामार्गांवरील आपत्कालीन आरोग्य व्यवस्थेला अधिक बळकटी मिळण्याची अपेक्षा आहे. ‘अपघातग्रस्तांना वेळेत वैद्यकीय उपचार मिळावेत आणि केवळ मदत पोहोचण्यास झालेल्या विलंबामुळे कोणाचाही जीव जाऊ नये, यासाठी प्रभावी आणि सक्षम यंत्रणा उभारणे आवश्यक आहे. प्रत्येक जीव अनमोल असून, अपघातग्रस्तांना तातडीने उपचार मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे,’ या भूमिकेतून हवाई रुग्णवाहिका सेवा सुरू करण्याच्या नियोजनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

Follow Us
मायक्रोसॉफ्टच्या सेवा जगभरात ठप्प, आऊटलुक बंद पडल्याने लाखो युजर्स...
Microsoft Services Down : मायक्रोसॉफ्टच्या सेवा जगभरात ठप्प, आऊटलुक बंद पडल्याने लाखो युजर्सना फटका; ई-मेल पाठवणं आणि उघडणं कठीण
गाण्याकडे द्वेष म्हणून पाहत असाल, तर...; राम कदम नेमकं काय म्हणाले?
Ram Kadam On Thackeray Brothers : गाण्याकडे द्वेष म्हणून पाहत असाल, तर...; राम कदम नेमकं काय म्हणाले?
भाजीपाला महागला, CNG-PNG दरवाढीचा फटका, गोकुळ दूधही महागण्याची शक्यता
Price Rate Hike : भाजीपाला महागला, CNG-PNG दरवाढीचाही फटका, गोकुळ दूधही महागण्याची शक्यता; सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं
विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून तटकरेंना खलनायक का ठरवलं जातंय? आदिती....
Aditi Tatkare On NCP Merger : विलीनीकरणाच्या मुद्द्यावरून तटकरेंना खलनायक का ठरवलं जातंय? आदिती तटकरेंचा थेट सवाल
नागपूरचे 320 विद्यार्थी शिवतीर्थावर अमित ठाकरेंच्या भेटीला; नेमकं...
Nagpur Students Meet Amit Thackeray : नागपूरचे 320 विद्यार्थी शिवतीर्थावर अमित ठाकरेंच्या भेटीला; नेमकं प्रकरण काय?
मोबाईलसाठी पैसे दिले नाहीत म्हणून मुलाने वडिलांना संपवलं....
Dharashiv : मोबाईलसाठी पैसे दिले नाहीत म्हणून मुलाने वडिलांना संपवलं; तुळजापूर तालुक्यात खळबळ
माझा फोन टॅप केला जातोय, राहुल गांधींचा गंभीर आरोप....
Rahul Gandhi : माझा फोन टॅप केला जातोय, राहुल गांधींचा गंभीर आरोप; पृथ्वीराज चव्हाणांचंही मोठं विधान, म्हणाले....
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर छगन भुजबळ यांचं मोठं विधान, म्हणाले...
NCP Merger : Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर छगन भुजबळ यांचं मोठं विधान, म्हणाले...
सुनेत्रा पवारांसोबतची भेट केवळ सदिच्छा भेट; विलीनीकरणाच्या चर्चांना...
NCP : सुनेत्रा पवारांसोबतची भेट केवळ सदिच्छा भेट; विलीनीकरणाच्या चर्चांना दत्तात्रय भरणेंनी दिला पूर्णविराम
छठपूजेवरून महाराष्ट्रात संघर्ष घडवण्याचा भाजपचा प्रयत्न? ठाकरेंचा आरोप
Raj Thackeray On Chhath Pooja : छठपूजेवरून महाराष्ट्रात संघर्ष घडवण्याचा भाजपचा प्रयत्न? राज ठाकरेंचा मोठा आरोप