AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पार्थ पवारांवरील आरोपांनंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ‘मी कधीही…’

Ajit Pawar comment on Parth Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार हे सध्या अडचणीत सापडले आहेत. त्यांच्यावर जमीन घोटाळ्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणावर अजित पवार यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

पार्थ पवारांवरील आरोपांनंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'मी कधीही...'
Ajit pawar on parth pawar
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Nov 06, 2025 | 6:11 PM
Share

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार हे सध्या अडचणीत सापडले आहेत. त्यांच्यावर जमीन घोटाळ्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी आरोप केला आहे की, पार्थ पवार यांनी 1800 कोटींची जमीन अवघ्या 300 कोटींमध्ये खरेदी केली आहे. यासाठी मुद्रांक शुल्क केवळ 500 रुपये भरल्याचा दावाही दानवेंनी केला आहे. त्यामुळे पार्थ पवार यांच्यासह अजित पवार आणि राज्य सरकारची चिंता वाढली आहे. या सर्व प्रकरणावर अजित पवार यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

पार्थ पवारांवर होणाऱ्या आरोपांवर बोलताना अजित पवारांनी म्हटले की, ‘माझा या प्रकरणाशी दुरान्वये देखील संबंध नाही. अशा चुकीच्या गोष्टी कोणीही करू नये अशा सूचना दिल्या होत्या. आता काही बातम्या येत आहेत. याची सगळी माहिती घेतो आणि नंतर बोलेल. मी आजपर्यंत कधीही नातेवाईकांना फायदा व्हावा यासाठी एकही अधिकाऱ्याला फोन केला नाही. ⁠माझ्या नावाचा वापर करून कोणी चुकीच काही करत असेल तर माझा पाठिंबा नसेल.’

मी कधीही चुकीच्या कामांना पाठिंबा देत नाही

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, ‘मी कायद्याच्या चौकटी मध्ये राहून काम करणारा कार्यकर्ता आहे. ⁠मुख्यमंत्र्ययांनी चौकशी जरूर करावी, तो त्यांचा अधिकार आहे. ⁠मी सगळी माहिती घेतो आणि उद्या तुम्हाला संध्याकाळी भेटेल. सर्व गोष्टी नियमात झाल्या पाहिजेत. तो पत्ता पार्थ यांच्या नावावर आहे, माझ्या नावावर नाही. ⁠मी आता बोल लो नसतो तर तुम्ही बोल का असता कुठेतरी पाणी मुरतंय. ⁠पण माझा कुठेही संबंध नाही. मुलं मोठी होतात ती त्यांचा व्यवसाय करतात. ⁠मी संविधानाला मानणारा माणूस आहे. मी कधीही चुकीच्या कामांना पाठिंबा देत नाही.’

चौकशीसाठी समिती स्थापन

पार्थ पवार यांच्या अमिडिया कंपनीला 1800 कोटी रूपयांची जमीन अवघ्या 300 कोटींना देण्यात आली आहे. या प्रकरणाची दखल आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. आता या संपूर्ण प्रकरणाची तपासणी करण्यासाठी चौकशीचे आदेश दिले असून राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाच्या सविस्तर चौकशीला सुरुवात होणार आहे.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?