AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी ! अजित पवारांच्या ताफ्यातील वाहनाचा अपघात, 4 जण गंभीर जखमी

Ajit Pawar Convoy Vehicle Accident : बीड जिल्ह्यात तेलगाव-धारूर रस्त्यावर धुनकवाड येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यातील वाहनाचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. यात 4 जण गंभीर जखमी झाले आहेत.

मोठी बातमी ! अजित पवारांच्या ताफ्यातील वाहनाचा अपघात, 4 जण गंभीर जखमी
Ajit Pawar Convoy vehicle accident
| Updated on: Nov 22, 2025 | 4:28 PM
Share

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यातील वाहनाचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. यात 4 जण गंभीर जखमी झाल्याचे समोर आले आहे. बीड जिल्ह्यात तेलगाव-धारूर रस्त्यावर धुनकवाड येथे हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात ताफ्यातील गाडीने एका दुचाकीला धडक दिल्याचे समाोर आले आहे. या अपघातात दुचाकीवरील विष्णू दामोदर सुदे, त्यांची पत्नी आणि दोन मुली गंभीर जखमी झाले आहेत. यातील जखमींवर रुग्नालयात उपचार सुरु आहेत. या अपघातानंतर चारचाकी वाहन पलटी झाल्याचीही माहिती समोर आली आहे. या अपघाताचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.

अजित पवारांच्या ताफ्यातील वाहनाने दुचाकीला उडवले

समोर आलेल्या माहितीनुसार, अजित पवारांचा ताफा तेलगावहून केजकडे जात होता. यावेळी धुनकवड फाट्याजवळ अजित पवार यांच्या ताफ्यातील MH 02 GH 5732 या वाहनाचे एका दुचाकीला धडक दिली. या अपघातात भोगलवाडी येथील विष्णू सुदे यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात विष्णू सुदे, त्यांची पत्नी कुसुम सुदे आणि दोन लहान मुली गंभीर जखमी झाल्या आहेत. चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

दुचाकीचा चुराडा

या अपघातानंतर जखमींना धारूर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारांसाठी नेण्यात आले. मात्र गंभीर दुखापत झाल्याने सर्वांना पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीचा चुराडा झाला आहे. तसेच ताफ्यातील वाहनाचेही मोठे नुकसान झाले आहे. या अपघातात अजित पवारांचा सुरक्षा रक्षकही जखमी झाला आहे. त्याच्यावरही उपचार सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.

गुन्हा दाखल होणार

या अपघातानंतर रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली आहे. आता पोलीसांनी या ताफ्यातील वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून स्थानिकांनी या कुटुंबाला न्याय मिळावा अशी मागणी केली आहे.

Follow Us
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...