शरद पवारही कुटुंबाच्या विरोधात गेले होते?; अजितदादा यांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट काय?

| Updated on: Apr 24, 2024 | 7:25 PM

आमची विकासाची कामं करण्यासाठी, राज्यातील विकासाचे प्रश्न सोडवण्यासाठी केंद्राचा निधी आणण्यासाठी भाजपसोबत गेलो. देश पातळीवर नजर टाकली तर पंतप्रधानपदाची दोन तीन लोकांची नावे सांगा. ती सांगा? एक मोदी साहेब आहेत. समोरून नाव येत नाही. अनेकदा एकत्र बसले. म्हणतात नंतर ठरवू. आपण कुणाच्या हाती सूत्रे देणार आहोत हे जनतेला कळायला नको?; असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.

शरद पवारही कुटुंबाच्या विरोधात गेले होते?; अजितदादा यांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट काय?
ajit pawar
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

बारामतीत पवार कुटुंबातच लढाई सुरू आहे. अजित पवार यांच्या बंडानंतर पवार कुटुंब दोन गटात विभागलं आहे. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे. मात्र, पवार कुटुंब पहिल्यांदाच दोन गटात विभागलं नसल्याचा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. यापूर्वीही पवार कुटुंब दोन पक्षात विभागलं गेलं होतं. संपूर्ण पवार कुटुंब शेतकरी कामगार पक्षाच्या बाजूने होतं, तर शरद पवार हे काँग्रेसच्या बाजूने होते, असा मोठा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केला आहे. अजित पवार यांनी टीव्ही9 मराठीला दिलेल्या विशेष मुलाखतीत अजितदादा यांनी हा गौप्यस्फोट केला आहे.

टीव्ही9 मराठीचे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विशेष मुलाखत घेतली. या मुलाखतीत अजितदादांनी हा गौप्यस्फोट केला. आमच्या घरात आजच असं झालेलं नाही. फार पूर्वी वसंतदादा पवार हे आमचे थोरले काका असतानाही असंच झालं होतं. आमचं अख्खं घराणं शेतकरी कामगार पक्षाचं होतं. हे नवीन पिढीला माहीत नाही. नवीन बारामतीकरांना माहीत नाही. जुन्या बारामतीकरांना माहीत आहे. तेव्हा एकटे पवार साहेब काँग्रेससाठी काम करत होते. अख्खं घराणं आजी, आजोबा, त्यांची मुली, मुलं सर्व मेंबर हे शेतकरी कामगार पक्षाचं काम करत होते. ही इतिहासाची नोंद आहे. 1962चा काळ होता, असं अजित पवार म्हणाले.

बहिणी म्हणतात दोघेही सारखेच

आमच्या इथं 1962 साली अख्खं कुटुंब एका साईडला होतं आणि एकटे पवार साहेब काँग्रेसकडे होते. बाकी सगळे शेकापकडे होते. आमच्या कुटुंबाला हे नवं नाही. विशेष नाही. तुम्ही म्हणता कुटुंब एकटं पडलं, पण कुटुंबातीलच ज्यांचा राजकारणाचा संबंध नाही. ते बाजूला आहेत. आम्हाला दोघेही सारखे आहेत, असं ते म्हणत आहेत. आमच्या अनेक बहिणी म्हणतात आम्हाला दोघे सारखे. आमचं कुटुंब मोठं आहे. काहींनी सांगितलं उमेदवार बदलला असता तर आम्ही संपूर्ण कुटुंबाने तुमचं काम केलं असतं. यातून त्यांच्या मनात काय आहे माहीत नाही. त्याच्या खोलात मी जात नाही. त्यांचा अधिकार आहे. कुणी कुणाचा प्रचार करावा हा ज्याचा त्याचा अधिकार आहे, असं अजितदादा यांनी स्पष्ट केलं.

कोणत्या अँगलने म्हटलं माहीत नाही

पवार कुटुंबातच लढाई होत आहे. यावर देवेंद्र फडणवीस यांनी हे कालचक्र असल्याचं म्हटलं होतं. त्यावर तुमचं मत काय? असा सवाल केला असता, त्यांनी कोणत्या अँगलने विचार करून कालचक्र आहे सांगितलं माहीत नाही. मी जेव्हा देवेंद्रजींना भेटेल तेव्हा विचारेल. पुण्याचा फॉर्म भरायचा आहे तेव्हा विचारेल, असं उत्तर त्यांनी दिलं.