Rohit Pawar : पत्रकार परिषदांमुळे हादरल्याने मॅनेज करण्याचा प्रयत्न का? रोहित पवारांच्या जवळच्या व्यक्तीला कोणाचा फोन आला? खळबळजनक गौप्यस्फोट

"डीजीसीए या लोकांना वाचवत आहे. दादांची चौकशी राहिली बाजूला. संजय पाठकने जजलाही मॅनेज करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे डीजीसीएला मॅनेज करायला किती वेळ लागेल?" असं रोहित पवार म्हणाले

Rohit Pawar : पत्रकार परिषदांमुळे हादरल्याने मॅनेज करण्याचा प्रयत्न का? रोहित पवारांच्या जवळच्या व्यक्तीला कोणाचा फोन आला? खळबळजनक गौप्यस्फोट
Rohit Pawar
| Updated on: Mar 04, 2026 | 12:02 PM

“व्हिके सिंगचा फोन आला होता. दीपक बोरकरला आम्ही फोन केला होता. आमच्या माणसाला व्हिके सिंगचा फोन आला. त्यांना वाटलं ते पत्रकार आहेत. एआयबीने मला क्लिअरन्स दिला आहे. अधिकची माहिती तुम्हाला कशाला हवी. खालपासून वरपर्यंत आमची ओळख आहे, असं व्हिके सिंग आमच्या लोकांना सांगत होता. कोणीच आमचं बिघडवू शकत नाही. असं व्हिके सिंग बोरकरला म्हणाले” असा दावा रोहित पवार यांनी केला. “आताही आमचे प्लेन उडत आहेत. सरकारही आमचे प्लेन वापरत आहे तर तुम्हाला अडचण काय? असा सवाल व्हीके सिंगने केला आहे. व्हीके सिंग हा व्हिएसआरचा मालक आहे. व्हॉट्सअप कॉल आला. तुमच्याकडे व्हॉट्सअप हॅकिंगची यंत्रणा असेल तर काढा. सहा महिने तो कुणाशी बोलत होता तेही काढा. महाराष्ट्र सदनमध्ये व्हिके सिंग कुणाला भेटला होता. तेही काढा. एवढा मोठा नेता गेल्यावर एवढी हिंमत येते कुठून?” असा प्रश्न रोहित पवार यांनी विचारला.

अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणात आज पुन्हा एकदा रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी तपासातील त्रुटींवर बोट ठेवताना अनेक मोठे गौप्यस्फोट केले. “आम्ही एफआयआर करा म्हणून सांगतो. पुरावे देऊन एआयबी चांगला तपास करेल वाटलं. पण कोणाची दखल घेत नाही. सुशांत सिंगच्या बाबतीत बिहार सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यावर दोन दिवसात सीबीआयने प्रकरण हाती घेतलं. अजितदादा जाऊन महिना झाला. त्यांच्या पक्षाने मुख्यमंत्र्यांकडे सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. त्याला १४ दिवस होऊनही चौकशी केली जात नाही. याचा अर्थ काय?” असं रोहित पवार म्हणाले.

डीजीसीएला मॅनेज करायला किती वेळ लागेल?

“तुमचा पैसा लेजिटिमेट आहे की हवाला मार्फत आणला याच्याशी आम्हाला घेणं नाही. फक्त चौकशी व्यवस्थित झाली पाहिजे एवढंच म्हणायचं आहे. 90 लाख शेअर विस्ता कंपनीचे आहेत. विस्ता सेलमध्ये अम्बूजा आणि लंबोदरची गुंतवणूक आहे. महेंद्र कुमार गोयंका या कंपन्यांमध्ये डायरेक्टर आहेत. या कंपनीत संजय पाठक नावाची व्यक्ती आहेत. ते भाजपचे मध्यप्रदेशचे आमदार आहेत. ते अतिशय श्रीमंत आहेत. या कंपन्यांमध्ये संजय पाठकचा मुलगा डायरेक्टर आहे. एका आमदाराने एक प्रायव्हेट विमान विकत घेतलं आहे. डीजीसीए या लोकांना वाचवत आहे. दादांची चौकशी राहिली बाजूला. संजय पाठकने जजलाही मॅनेज करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे डीजीसीएला मॅनेज करायला किती वेळ लागेल?” असं रोहित पवार म्हणाले

Follow Us