AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Pawar : त्यागी समितीने कुठला नियम बनवलेला? त्याचा अजितदादाच्या विमान अपघाताशी काय संबंध?

Rohit Pawar : रिपोर्टनुसार विमान 4915 उडालं. लास्ट मेजर इन्स्पेक्शन 23 मार्च 2025 रोजी झालं होतं. याचा अर्थ हे विमान खराब होतं. त्यामुळे हे विमान अजितदादांना मुद्दाम दिलं का? असा संशय निर्माण होतो"

Rohit Pawar : त्यागी समितीने कुठला नियम बनवलेला? त्याचा अजितदादाच्या विमान अपघाताशी काय संबंध?
Rohit Pawar
| Updated on: Mar 04, 2026 | 11:44 AM
Share

“व्हिजीबिलीटी नसताना या विमानाला बारामतीला जाण्याची परवानगी कशी दिली? टेक ऑफ करायला कसं दिलं? एआयएबीने त्याकडे दुर्लक्ष केलं. दोन्ही पायलटांना बारामती विमानतळावर लँडिंगची माहिती होती. त्यांना 29 नंबरचा रनवे आणि 11 नंबरचा कुठला हे माहीत होतं. या रिपोर्टमध्ये तसं नमूद केलं आहे. ते बारामतीत अनेकदा लँड झाल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलंय” असं रोहित पवार म्हणाले. अजित पवार विमान अपघात प्रकरणात रोहित पवार यांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी तपासातील त्रुटींवर बोट ठेवलं. “2009 मध्ये वायएसआर रेड्डी यांचं हेलिकॉप्टर अपघातात निधन झालं. त्यावेळी तपासासाठी नेमलेल्या त्यागी समितीने व्हिजीबिलीटी नसताना विमान लँड करायचं नाही, खासकरुन व्हिआयपी विमानात असताना, असं त्यागी समितीने म्हटलं होतं. वायएसआर रेड्डी यांचं निधन झाल्यावर त्यागी समिती नेमली होती. त्या समितीने हा रिपोर्ट दिला होता. तरीही व्हिजीबिलीटी नसताना विमान का लँड करण्यात आलं?” असा सवाल रोहित पवार यांनी विचारला.

“अॅरो नावाच्या ग्रुपमध्ये सिव्हिल एव्हिएशन गव्हर्मेंट आणि सरकारी अधिकारी होते. त्यामुळे अॅरो नावाच्या ग्रुपमधील सर्वांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. एफआयआरमध्ये अॅरोमधील अधिकाऱ्यांचे नाव आलं पाहिजे” अशी मागणी रोहित पवार यांनी केली. “रिपोर्टनुसार विमान 4915 उडालं. लास्ट मेजर इन्स्पेक्शन 23 मार्च 2025 रोजी झालं होतं. याचा अर्थ हे विमान खराब होतं. त्यामुळे हे विमान अजितदादांना मुद्दाम दिलं का? असा संशय निर्माण होतो” याकडे रोहित पवार यांनी लक्ष वेधलं.

विमान शमशाबादला जाणार की नाही हे कळवलं नव्हतं

“जर्नी लॉग बुकमध्ये व्हिएसआर कंपनी कसा गोंधळ घालायची आणि डीजीसीए त्याला कसा सपोर्ट करायची ते दिसून येईल. शमशाबादला हे विमान जाणार होतं. पण बारामती एटीसीला हे विमान शमशाबादला जाणार की नाही हे कळवलं नव्हतं. मेलही केला नव्हता. रिपोर्टमध्ये फक्त बारामती टू बारामती असं उड्डाण दाखवलं आहे” असं रोहित पवार म्हणाले. “2023 च्या विमान अपघाताच्या एका अहवालात तपास अधिकाऱ्यांची नावे देण्यात आली होती. या अहवालात तरी कोणाचेही नाव देण्यात आलेले नाही. दादांच्या बाबतीत भेदभाव का ? तपास अधिकाऱ्यांची नावे नाहीत याचा अर्थ ते घाबरले आहेत का ?” असे प्रश्न रोहित पवार यांनी विचारले.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...