AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Pawar : हा भेदभाव अजित दादांच्या बाबतीतच का ? रोहित पवारांचा सवाल

अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या AAIB अहवालावर रोहित पवारांनी गंभीर आक्षेप घेतले आहेत. 2023 मधील दुसऱ्या अपघाताशी तुलना करत, त्यांनी अजित दादांच्या अहवालात तपास अधिकाऱ्याचे नाव नसणे आणि पुराव्यांमध्ये हेराफेरीची शक्यता व्यक्त केली. हा 'भेदभाव' केवळ अजित पवारांच्या बाबतीतच का, असा थेट सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला असून, त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी केली आहे.

Rohit Pawar : हा भेदभाव अजित दादांच्या बाबतीतच का ?  रोहित पवारांचा सवाल
रोहित पवार
| Updated on: Mar 04, 2026 | 11:35 AM
Share

अजित पवार यांच्या निधानंतर AAIB चा अहवाल समोर आला. मात्र त्यातील अनेक मुद्यांवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार, अजित पवारांचे पुतणे रोहित पवार यांनी आक्षेप घेतला आहे. आज सकाळी रोहित पवार यांनी पुन्हा एक पत्रकार परिषद घेत या रिपोर्टबद्दल अनेक खुलासे केले. अजित पवार यांच्या विमान अपघाताबद्दल करण्यात येणारी चौकशी, तपासासंदर्भात रोहित पवार यांनी आधीही नाराजी व्यक्त केली होती. आजच्या पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक मुद्दे मांडत अजित दादांच्या बाबतीत भेदभाव का असा सवाल उपस्थित केला आहे. त्यासाठी त्यांनी 2023 साली झालेल्या एका अपघाताचाही संदर्भ दिला.

काय म्हणाले रोहित पवार ?

2023 साली मुंबईत व्हीएसआरच्या लेअरजेटचा अपघात झाला होता. त्या इनव्हेस्टिगेशन टीममध्ये के. रामचंद्र हे इन चार्ज होते आणि इन्व्हेस्टिगेटर म्हणून आनंदन यांच् नाव दिलं होतं. पण अजित दादांचा अपघात जो झाला, त्या रिपोर्टमध्ये कोणत्याही इन्व्हेस्टिगेटरचं नाव लिहीलेलं नाही. कदाचित इन्व्हेस्टिगेटरच घाबरले असतील, असा दावा रोहित पवार यांनी केला. यात मॅनिप्युलेशन , कागदपत्रांची हेराफेरी आणि इतक्या गोष्टी होणार आहेत, तर नावचं देऊ नका, म्हणजे उद्या कोणावरही आक्षेप घ्यायला नको, अशी भूमिका असावी, असंही रोहित पवार म्हणाले.

2023 साली जो अपघात झाला, व्ही. के सिंग यांनी स्वत:च्या प्रायव्हेट ट्रकमध्ये ,विमान पडलं, ब्लॅकबॉक्सपासून सगळं स्वत: हाताळून दिल्लीला नेलं होतं असं आम्हाला कळलं आहे. मग अजित दादांच्या बाबीत इन्व्हेस्टिगेशन टीम का नाही असा प्रश्न आमच्या मनात आहे. हा भेदभाव दादांच्या बाबतीतच का केला जातो, ही शंकाही आमच्या मनात आहे, असं रोहित पवार म्हणाले.

विमान लँड करण्याची परवानगी कशी ?

या विमानाला बारामतीला जाण्याची परवानगी कशी दिली,   टेक ऑफ करायला कसं दिलं असा सवाल वितारत  एआयएबीने त्याकडे दुर्लक्ष केलं असा आरोप रोहित पवारांनी केला.  दोन्ही पायलट्सना बारामती विमानतळावर लँडिंगची माहिती होती. त्यांना 29 नंबर कुठला आणि 11 नंबर कुठला हे माहीत होतं. या रिपोर्टमध्ये तसं नमूद केलं आहे. ते बारामतीत अनेकदा लँड झाल्याचं रिपोर्टमध्ये म्हटलंय असंही रोहित पवारांनी सांगितलं.  व्हिजीबिलीटी नसताना विमान लँड करायचं नाही, असं त्यागी समितीने म्हटलं आहे. वायएसआर रेड्डी यांचं निधन झाल्यावर त्यागी समिती नेमली होती. त्या समितीने हा रिपोर्ट दिला होता. तरीही लँड करण्यात आलं, असा आरोप रोहित पवार यांनी केला

 

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...