AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तंबाखू चोळण्यात मग्न असलेल्या वॉर्डबॉयमुळे महिलेवर आली भयानक वेळ, सत्य परिस्थिती जाणून तुम्हीही संतापाल…

सोशल मीडियामुळे चांगल्या गोष्टी देखील समोर येतात आणि वाईट घटनांचा देखील पर्दाफाश होतो. आता देखील असंच काही झालं आहे. तंबाखू चोळण्यात मग्न असलेल्या वॉर्डबॉयमुळे महिलेवर आली भयानक वेळ... जाणून नेमकं काय झालं

तंबाखू चोळण्यात मग्न असलेल्या वॉर्डबॉयमुळे महिलेवर आली भयानक वेळ, सत्य परिस्थिती जाणून तुम्हीही संतापाल...
| Updated on: Jun 08, 2026 | 1:17 PM
Share

अकोल्यातील एका व्हायरल व्हिडिओमुळे असंवेदनेचा भेसूर चेहरा समोर आलाय. एकीकडे विकसित राष्ट्राचे ढोल बडवले जात असताना देशातील आरोग्य व्यवस्था किती तकलादू आहे, याचा बोलका पुरावा अकोल्यातील या व्हिडिओनं दिलाय. ‘ब्रेन स्ट्रोक’ आलेल्या रुग्ण पतीला शासकीय रुग्णालयात स्ट्रेचर नसल्याने थेट पाठीवर बसवत त्याच्या उपचारासाठी जीवाच्या आकांताने धावपळ करणाऱ्या एका महिलेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अकोल्यातील आरोग्य यंत्रणेत प्रचंड खळबळ उडालीये. व्हिडीओ समोर आल्यानंतर सरकारची कुंभकर्णी झोपेत असलेली व्यवस्था… अशीच सर्वत्र टीका होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या आदिवासी महिलेचा पतीच्या उपचारार्थ हा संघर्ष अगदी हृदय हेलावून टाकणारा आहे. पोटाला बांधलेली बॅग, पाठीवर घेतलेला पती.. अशा अवस्थेत महिला संपूर्ण रुग्णालयात फिरत असल्याचं चित्र थक्क करणारं होतं. अकोला शासकीय रुग्णालयातील हा व्हिडिओ असल्याचं समोर आलं आहे.

रस्त्याचं काम करणारी आदिवासी महिला आपल्या पतीच्या उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल झाली होती.. मात्र स्ट्रेचरअभावी या महिलेवर पतीला पाठीवर नेण्याची वेळ आली.. परंतु या संदर्भात शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हा व्हिडिओ AI जनरेट असू शकतो, असा दावा केलाय.. परंतु या संदर्भात त्यांन कॅमेऱ्यावर बोलयला अधिकाऱ्यांनी स्पष्ट नकार दिलाय..

अकोला जिल्हा शासकीय रुग्णालयातील अधिष्ठाता संजय सोनुने म्हणाले, हा व्हिडिओ या AI जनरेट असू शकतो, अकोला शासकीय रुग्णालयात आठ जणांची टोळी आहे. हे टोळी अशाप्रकारे रुग्णांकडून VIDEO तयार करून घेतात. त्यानंतर ब्लॅकमेलिंगचे प्रकार करत असतात. हा व्हिडिओ देखील एका तरुणाने तयार करून घेतलेला आहे, त्याची माहिती आमच्याकडे आली आहे. सखोल चौकशी करून योग्य ती माहिती तुम्हाला दिल्या जाईल.

मात्र हा व्हिडिओ AI जनरेट नसून खरा आहे.. जिने हा व्हिडिओ मोबाईलमध्ये शूट केला आहे. त्या तरुणीचा Tv9 मराठी ‘ने शोध घेतला आहे.. अनुराधा नाथे असं व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्या तरुणीचं नाव आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अकोल्यातील आरोग्य यंत्रणेत प्रचंड खळबळ उडालीये. कुंभकर्णी झोपेत असलेल्या व्यवस्थेवर आता राज्यभरातून चौफेर टीका होत आहे.

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली