AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

यमुनोत्री-गंगोत्रीचे दर्शन सुखात झाले, पण केदारनाथला पोहोचण्यापूर्वीच…; सेवानिवृत्त अधिकाऱ्यावर काळाची झडप

अकोला जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त अधिकारी रमेश रामकृष्ण केने यांचे चारधाम यात्रेदरम्यान निधन झाले. केदारनाथ चढाईदरम्यान प्रकृती बिघडल्याने हरिद्वारमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

यमुनोत्री-गंगोत्रीचे दर्शन सुखात झाले, पण केदारनाथला पोहोचण्यापूर्वीच...; सेवानिवृत्त अधिकाऱ्यावर काळाची झडप
Char Dham Yatra
| Updated on: Jun 08, 2026 | 7:57 AM
Share

उत्तराखंडमधील पवित्र चारधाम यात्रेसाठी गेलेल्या अकोल्यातील एका भाविकाचा हृदयद्रावक मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. अकोला जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त अधिकारी रमेश रामकृष्ण केने असे या मृत भाविकाचे नाव आहे. रमेश हे केदारनाथची चढाई चढत असताना अचानक त्यांची प्रकृती बिघडली. यानंतर हरिद्वार येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्याचदरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या घटनेमुळे अकोला शहरात आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

यमुनोत्री-गंगोत्रीचे दर्शन झाले, पण…

मिळालेल्या माहितीनुसार, रमेश केने हे गेल्या २५ मे रोजी अकोल्यातून चारधाम यात्रेसाठी रवाना झाले होते. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी आणि इतर नातेवाईकांसह उत्साहाने सहभागी झाले होते. यात्रेदरम्यान त्यांनी यमुनोत्री आणि गंगोत्री धामचे अतिशय सुखरूप आणि आनंदाने दर्शन घेतले. मात्र, पुढील टप्प्यात केदारनाथ धामकडे जात असताना काळाने त्यांच्यावर झडप घातली.

४ जूनला बिघडली प्रकृती

४ जून रोजी केदारनाथची कठीण चढाई चढत असताना रमेश केने यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्यांची प्रकृती वेगाने खालावली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी हरिद्वार येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे डॉक्टरांच्या पथकाने त्यांच्यावर शर्थीचे उपचार सुरू केले. मात्र, दुर्दैवाने उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने अखेर रविवारी (७ जून) त्यांची प्राणज्योत मालवली.

एक कर्तव्यदक्ष सेवानिवृत्त अधिकारी आणि मनमिळावू व्यक्तिमत्त्व म्हणून रमेश केने अकोल्यात परिचित होते. त्यांच्या या आकस्मिक निधनाने केने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

चारधाम यात्रेला जाताना काय काळजी घ्याल?

चारधाम यात्रेमध्ये विशेषतः केदारनाथ आणि यमुनोत्री येथे हवा थंड असते आणि उंचीवर ऑक्सिजन कमी असतो. त्यामुळे प्रवास सुखरूप होण्यासाठी काही सोप्या टिप्स लक्षात ठेवा

  • यात्रेला निघण्यापूर्वी शरीराची तपासणी करून घ्या. बीपी, शुगर किंवा हृदयाचा त्रास असेल, तर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच प्रवासाला जा आणि औषधे सोबत ठेवा.
  • उंचीवरील वातावरणाशी शरीराला जुळवून घेण्यासाठी प्रवासात मध्ये-मध्ये विश्रांती घ्या. अचानक थंड हवेत गेल्याने त्रास होऊ शकतो.
  • केदारनाथची चढाई करताना अजिबात पळू नका. संथ गतीने पावले टाका. खूप दम लागल्यास तिथेच थांबा आणि गरज वाटल्यास घोडा किंवा पालखीचा वापर करा.
  • प्रवासात सतत थोडे-थोडे कोमट पाणी पीत राहा. शरीरात ताकद राहण्यासाठी सोबतीला चॉकलेट, सुका मेवा किंवा ग्लुकोज ठेवा.
  • चढाई करताना ऑक्सिजन कमी पडू नये म्हणून बाजारात मिळणारे लहान ऑक्सिजन कॅन (Oxygen Can) सोबत ठेवा.
  • छातीत दुखणे, चक्कर येणे किंवा जास्त दम लागल्यास त्वरित जवळच्या सरकारी वैद्यकीय केंद्रात दाखवा. स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका.

Follow Us
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात