AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अक्षय्य तृतीयेला सोने-चांदीने मोडले रेकॉर्ड, खरेदीसाठी मोजावे लागणार इतके रुपये; आजचे दर पाहून घाम फुटेल

अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सोन्या-चांदीच्या किमतीत ऐतिहासिक वाढ झाली असून २४ कॅरेट सोन्याचा दर १.५७ लाख रुपयांवर पोहोचला आहे. जाणून घ्या आजचे ताजे बाजारभाव आणि दरवाढीमागील मुख्य कारणे.

अक्षय्य तृतीयेला सोने-चांदीने मोडले रेकॉर्ड, खरेदीसाठी मोजावे लागणार इतके रुपये; आजचे दर पाहून घाम फुटेल
Akshaya Tritiya gold
| Updated on: Apr 19, 2026 | 7:40 AM
Share

हिंदू धर्मातील अत्यंत शुभ मानल्या जाणाऱ्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या अक्षय्य तृतीयेचा सण मानला जातो. राज्यात अक्षय्य तृतीयेचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. अक्षय्य म्हणजे ज्याचा कधीही क्षय होत नाही. हिंदू धर्मात अक्षय्य तृतीयेला विशेष महत्त्व असते. या दिवशी केलेली गुंतवणूक किंवा खरेदी घरात कायमस्वरूपी समृद्धी घेऊन येते. त्यामुळे अनेक जण या दिवशी सोने खरेदी करण्याला प्राधान्य देत असतात. याच पार्श्वभूमीवर आज सराफा बाजारात मोठी गर्दी दिसून येत आहे. जागतिक बाजारपेठेतील घडामोडींमुळे यंदा सोने-चांदीच्या किंमती चांगल्याच वधारल्या आहेत. आजही सोने चांदीच्या भावाने अपेक्षापेक्षा जास्त भरारी घेतली आहे.

सोने-चांदीचे भाव काय?

यंदा अक्षय तृतीयेच्या दिवशी सोन्याने विक्रमी टप्पा गाठला आहे. तसेच चांदीच्या किमतीतही ऐतिहासिक वाढ झाली आहे. अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सोने आणि चांदी खरेदी करण्याची जुनी परंपरा असली, तरी यंदा ग्राहकांना आपल्या खिशाला मोठी कात्री लावावी लागणार आहे. बाजारपेठेतील ताज्या आकडेवारीनुसार, आज सोन्याचे (२४ कॅरेट) दर जीएसटीसह साधारण १ लाख ५७ हजार रुपये प्रति १० ग्रॅम इतक्या विक्रमी स्तरावर पोहोचले आहे.

केवळ सोनेच नाही, तर चांदीच्या किंमतीतही मोठी उसळी पाहायला मिळत आहे. चांदीचा दर जीएसटीसह साधारण २ लाख ६७ हजार रुपये प्रति किलो इतका झाला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत झालेली ही दरवाढ अत्यंत मोठी आहे. जागतिक बाजारपेठेतील अस्थिरता आणि युद्धजन्य परिस्थितीमुळे सोने-चांदीच्या किंमतीवर थेट परिणाम झाल्याचे मानले जात आहे. अशा महागड्या दरामुळे यंदा मुहूर्त साधण्यासाठी ग्राहकांना मोठी रक्कम मोजावी लागत आहे.

यंदाचे भाव वाढण्यामागे कारण काय?

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा झालेली दरवाढ सामान्य ग्राहकांचे बजेट कोलमडणारी ठरत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सोन्याचे दर तब्बल ५७,००० रुपयांनी वाढले आहेत. तर चांदीने तर दरवाढीचे सर्व रेकॉर्ड मोडले असून, गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा चांदीच्या भावात तब्बल १ लाख ६३ हजारांची मोठी वाढ झाली आहे.

तज्ज्ञांच्या मते, ही दरवाढ केवळ देशांतर्गत मागणीमुळे नसून जागतिक राजकीय स्थितीचा त्यावर मोठा परिणाम झाला आहे. गेल्या वर्षभरापासून सुरू असलेले रशिया-युक्रेन युद्ध आणि मध्यपूर्वेतील तणाव यामुळे गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे आपला मोर्चा वळवला आहे. तसेच अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची टॅरिफ व्यापार शुल्क संदर्भातील धोरणे आणि जागतिक बँकांच्या बदलते व्याजदर यामुळे सोन्याच्या भावात अनपेक्षित वाढ पाहायला मिळत आहे.

दरम्यान सोने चांदीत झालेली दरवाढ मोठी असली, तरी सोन्याच्या शुद्धतेवर आणि गुणवत्तेवर विश्वास ठेवून नागरिक हॉलमार्क असलेल्या दागिन्यांच्या खरेदीला प्राधान्य देत आहेत. ज्यांना मोठे दागिने घेणे परवडत नाही ते सोन्याच्या नाण्यांऐवजी चांदीची नाणी किंवा लहान वस्तू खरेदी करून मुहूर्त साधताना दिसत आहेत.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...